कोनांबे विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 10:19 PM2016-01-14T22:19:53+5:302016-01-14T22:26:57+5:30

ज्येष्ठांच्या प्रयत्नांना यश : चिठ्ठ्या काढून निवड

Election of Konambe Vikas Sanstha unanimously | कोनांबे विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

कोनांबे विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

Next

कोनांबे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कोनांबे येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी ३७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ११ जणांनी माघार घेतली. उर्वरित २६ इच्छुकांमधून १३ चिठ्ठ्या काढून संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्था स्थापनेपासून ५५ वर्षे फक्त गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदान घ्यावे लागले होते. यावेळी पुन्हा बिनविरोध निवड करून सभासदांनी आर्थिक संस्थेत राजकारण टाळले.
बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण गट (८ जागा)- रामदास कचरू डावरे, सुरेश कारभारी डावरे, पंढरी त्र्यंबक पांचवे, कारभारी अर्जुन डावरे, प्रकाश लक्ष्मण डावरे, जगन्नाथ पिराजी डावरे, बाळू मुरलीधर सोनवणे, अशोक भाऊशेठ डावरे. महिला राखीव (२ जागा)- सत्यभामा पंढरी डावरे व आशा जयराम डावरे. अनुसूचित जाती-जमाती- अशोक राणू गवारे, इतर मागास प्रवर्ग- बाळू निवृत्ती डावरे. विशेष मागास प्रवर्ग- हरी कचरू मुत्रक. यावेळी ग्रामंपचायत सदस्य प्रकाश डावरे, राजेंद्र लहामगे, बापू गवारे, माजी सरपंच संतोष डावरे, बाजीराव डावरे, सुदाम डावरे, तानाजी डावरे, रामनाथ डावरे, वसंत पांचवे, दत्तात्रय डावरे, अंबादास भागवत, अरुण मुंडे यांच्यासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. डी. त्रिभुवन व सहायक म्हणून संस्थेचे सचिव विलास शिरसाठ, भाऊराव डावरे, बाळू गवारे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
२४ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश
नाशिक : मकर संक्रांती, विविध कंपन्यांचे मोर्चे, मिरवणुका या पार्श्वभूमीवर रविवार, दि. २४ जानेवारीपर्यंत नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तालयातर्फे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शांततेचा भंग झाल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

Web Title: Election of Konambe Vikas Sanstha unanimously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.