नामकोच्या अध्यक्षपदाची ५ जानेवारीस निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:54 AM2018-12-29T00:54:30+5:302018-12-29T00:54:47+5:30

उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या नागरी सहकारी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांना शुक्रवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत विजयी घोषित केले, तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी ५ जानेवारी बैठक बोलवण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी यावेळी सांगितले.

 Election of Nomko to 5th January | नामकोच्या अध्यक्षपदाची ५ जानेवारीस निवडणूक

नामकोच्या अध्यक्षपदाची ५ जानेवारीस निवडणूक

Next

सातपूर : उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या नागरी सहकारी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांना
शुक्रवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत विजयी घोषित केले, तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी ५ जानेवारी बैठक बोलवण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी यावेळी सांगितले.
नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २३ रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत प्रगती, सहकार आणि नम्रता असे तीन पॅनेलमध्ये लढत झाली. त्यात प्रगती पॅनेलच्या सर्वच्या सर्व म्हणजेच २१ जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. दि. २६ रोजी मतमोजणी घेण्यात आल्यानंतर शुक्र वारी बँकेच्या मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी दिगंबर अवसारे, बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया, व्यवस्थापक अमृता साठे उपस्थित होते.  या सभेत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी विजयी झालेल्या संचालकांना विजयी घोषित केले आणि प्रमाणपत्रांचे वाटप केले. नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने हेमंत धात्रक यांनी मनोगत व्यक्त केले, तर काही सभासदांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title:  Election of Nomko to 5th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.