दप्तर वितरहीत शाळा उपक्रमांतर्गत लोकशाही पध्दतीने निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:42 PM2019-07-10T17:42:13+5:302019-07-10T17:42:30+5:30
सिन्नर : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील जनता विद्यालयात दप्तर विरहित शाळा या नवीन उपक्रमार्तगत भारताच्या लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
सिन्नर : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील जनता विद्यालयात दप्तर विरहित शाळा या नवीन उपक्रमार्तगत भारताच्या लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार यांच्या कल्पनेवर आधारित दर शनिवार दप्तर वितरीहत शाळा उपक्रम राबविला जातो. विद्यालयाचे प्राचार्य डी. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृतीयुक्त अभियान शिक्षणातून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला.
उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघारी घेणे, प्रचार सभा, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी प्रक्रिया, विजयी उमेदवार घोषित करणे, मंत्रीमंडळाची स्थापना, शपथविधी या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. या निवडणुकीच्या आधारे विद्यालयाच्या पंतप्रधानपदी कल्याणी बोडके तर उपपंतप्रधानपदी वैष्णवी सिकची यांची निवड करण्यात आली. राष्टÑपदीपदी पायल लोहकरे हिची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे प्राचार्य पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.