बीएलओंची निवडणूक अधिकाºयांशी हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:27 AM2017-11-18T00:27:52+5:302017-11-18T00:31:35+5:30
निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये सुरू झालेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन करण्यात येणाºया सर्वेक्षणात मतदारांचे पत्ते सापडत नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी प्रशिक्षणासाठी हजर राहिलेल्या केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकाºयांशी हुज्जत घातली परिणामी प्रशिक्षणात काहीकाळ व्यत्यय आला.
नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये सुरू झालेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन करण्यात येणाºया सर्वेक्षणात मतदारांचे पत्ते सापडत नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी प्रशिक्षणासाठी हजर राहिलेल्या केंद्रस्तरीय अधिकाºयांनी (बीएलओ) गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकाºयांशी हुज्जत घातली परिणामी प्रशिक्षणात काहीकाळ व्यत्यय आला. अखेर उपजिल्हानिवडणूक अधिकाºयांनी मध्यस्थी करीत बीएलओंची समजूत घातल्याने वादावर पडदा पडला. मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी मतदार यादी घेऊन प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्याची खात्री करण्याबरोबरच नवीन मतदारांची नोंदणी, दुबार, मयत मतदारांचे नाव वगळणे, भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करणे आदी कामे सोपविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने बीएलओची नेमणूक करताना शासकीय कर्मचाºयांच्या माध्यमातून करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, बहुतांशी बीएलओ शिक्षकच आहेत. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. सध्या शिक्षकांना सहामाही परीक्षेचे व निकालपत्र तयार करण्याचे काम दिलेले असल्याने त्यातच बीएलओंचे कामे सोपविण्यात आल्याने व ३० नोव्हेंबरपर्यंतच सदरचे काम पूर्ण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी शुक्रवारी नाशिक शहरातील बीएलओंचे प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात आले होते. यावेळी काही बीएलओंनी प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या निवडणूक अधिकाºयांना धारेवर धरले. सेवानिवृत्तीला काही कालावधी बाकी असताना या वयात कसे फिरायचे असा सवाल करीत, मतदार याद्यांमध्ये मतदारांचे पत्ते अर्धवट व चुकीचे असल्याने ते सापडत नाहीत, त्यामुळे मतदारांचे परिपूर्ण पत्ते असलेली मतदार यादी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मागण्या : थेट उपजिल्हाधिकाºयांकडे धाव
दैनंदिन शाळेचे कामकाज सांभाळून उर्वरित वेळेत काम कसे करायचे, त्यापेक्षा आम्हाला शैक्षणिक कामातून मुक्त करावे, मतदार याद्या पुनरीक्षणाचे कामाची मुदत वाढवून द्यावी आदी मागण्या करण्यास सुरुवात केल्याने प्रशिक्षण कार्यशाळेत गोंधळ उडाला, त्यातच निवडणूक अधिकाºयानेदेखील दुरुत्तरे केल्याने संतापलेल्या बीएलओंनी कार्यशाळेतून काढता पाय घेत, थेट उपजिल्हानिवडणूक अधिकाºयांकडे धाव घेत तक्रार केली. त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली, नंतर मात्र प्रशिक्षण कार्यशाळा सुरुळीत पार पडली.