निवडणूक कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत देणार प्रशिक्षण

By admin | Published: January 28, 2017 11:43 PM2017-01-28T23:43:26+5:302017-01-28T23:43:45+5:30

६७८३ कर्मचारी : तीन ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था

Election personnel will be given training in two stages | निवडणूक कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत देणार प्रशिक्षण

निवडणूक कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत देणार प्रशिक्षण

Next

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच मतदान व मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारीही सुरू झाली असून, निवडणूक कामासाठी नियुक्त ६,७८३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. दि. ५ व १२ फेबु्रवारीला रविवारी सुटीच्या दिवशी सदर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  महापालिका निवडणुकीसाठी दि. २१ फेबु्रवारीला मतदान, तर दि. २३ फेबु्रवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिकेने निवडणूक कामासाठी ६,७८३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांसह विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ७, १२,२४, १६, २३ आणि ३० या सहा प्रभागांसाठी नियुक्त १,२३२ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ या वेळेत, तर प्रभाग क्रमांक १७, १८, १९, २०, २१ आणि २२ या प्रभागांसाठी नियुक्त १,१३६ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे घेतले जाणार आहे. प्रभाग क्रमांक ८ ते ११ या चार प्रभागांसाठी नियुक्त ९३० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ या वेळेत, तर १३ ते १५ या प्रभागांसाठी नियुक्त ९८५ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत महाकवी कालिदास कलामंदिरात होणार आहे. प्रभाग क्रमांक १ ते ६ यासाठी नियुक्त १,२९६ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ व प्रभाग क्रमांक २५ ते २९ आणि प्रभाग ३१ यासाठी नियुक्त १,२०४ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Election personnel will be given training in two stages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.