व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार उद्या उपनगराध्यक्ष पदाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 04:36 PM2020-07-27T16:36:19+5:302020-07-27T16:37:49+5:30
सिन्नर : सिन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी बुधवारी (दि.29) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे.

सिन्नर नगरपरिषदेवर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची एकहाती सत्ता असून उपनगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड होईल असे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या पदासाठी अनेकजण इच्छुक असले तरी नगरसेवक पंकज मोरे व नगरसेवक प्रणाली भाटजिरे-गोळेसर यांची नावे अग्रभागी असल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी 24 मार्च रोजी पदाचा राजीमाना दिला आहे. तेव्हापासून हे पद रिक्त असल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासन अधिकारी भा. व. गोसावी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार्या या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी संंबधित उमेदवार अथवा सूचक, अनुमोदक उमेदवारी अर्ज पिठासन अधिकार्यांकडे प्रत्यक्ष दाखल करतील. अन्य सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला हजेरी लावतील अशी माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली.
दरम्यान, बुधवारी सकाळी 10 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी, माघार आणि निकाल असा कार्यक्रम पार पडणार आहे.