सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:16 AM2022-02-05T00:16:32+5:302022-02-05T00:16:32+5:30

कळवण : जिल्ह्यातील कळवण, निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह दिंडोरी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. १५ फेब्रुवारी रोजी नवीन नगराध्यक्ष मिळणार असून नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.

Election program for the post of Mayor of six Nagar Panchayats announced | सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next
ठळक मुद्दे१५ला निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष सभा घेण्याची निर्देश

कळवण : जिल्ह्यातील कळवण, निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह दिंडोरी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचानिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. १५ फेब्रुवारी रोजी नवीन नगराध्यक्ष मिळणार असून नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.

सहा नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक २१ डिसेंबर आणि १८ जानेवारीला झाल्या. या निवडणुकांचा निकाल १९ जानेवारी जाहीर झाला होता. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या सहा नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी १५ फेब्रुवारीला विशेष सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या सभेसाठी कळवणला सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, सुरगाणा येथे उपविभागीय अधिकारी बबन काकडे, देवळा येथे उपविभागीय अधिकारी सी. एच. देशमुख, निफाड येथे उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, पेठ येथे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, दिंडोरी येथे उपजिल्हाधिकारी नीलेश श्रोगी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहेत. नामनिर्देशन पत्र दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळात स्वीकारले जाणार असून, छाननी त्याच दिवशी दुपारी २ वाजेनंतर सुरू करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे फेटाळलेल्या उमेदवारांची नावे आणि कारणे सूचना फलकावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिली जाणार आहेत. उमेदवारांना पीठासीन अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध ११ फेब्रुवारीपर्यंत अपील करता येणार आहे, तर उमेदवारी अर्ज १४ फेब्रुवारीला मागे घेता येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी ११ फेब्रुवारीला दुपारी ५ नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक आणि निकाल १५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विशेष सभेत घोषित होणार आहे. त्यानंतर नगरपंचायत उपाध्यक्षपदाची निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी होणार असून, सकाळी ९ ते ११ यावेळात नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार असून, नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर उपाध्यक्ष पदाच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येऊन निवडप्रक्रिया होणार आहे.

Web Title: Election program for the post of Mayor of six Nagar Panchayats announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.