निफाड तालु्क्यातील ३३ गावांच्या सरपंच, उपसरपंचांची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:35 PM2021-02-24T18:35:47+5:302021-02-24T18:36:15+5:30
विंचूर : निफाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवार (दि.२५) रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून, बहुतेक ग्रामपंचायत सदस्य ह्यनॉट रिचेबलह्ण असल्याने निवडणुकीच्या दिवशीच ते संपर्ककक्षेत येणार असल्याचे दिसते.
विंचूर : निफाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाचीनिवडणूक गुरुवार (दि.२५) रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असून, बहुतेक ग्रामपंचायत सदस्य ह्यनॉट रिचेबलह्ण असल्याने निवडणुकीच्या दिवशीच ते संपर्ककक्षेत येणार असल्याचे दिसते.
जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, चांदवड व नांदगाव या चार तालुक्यांमधील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका शिल्लक आहेत. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेता एकाच दिवशी निवडणुका घेणे शक्य होणार नसल्याने २५ व २६ फेब्रुवारी या दोन दिवसांत तालुक्यातील सरपंचपदाच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी निफाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडप्रक्रिया होणार आहे. सरपंच पदाच्या आरक्षणानंतर अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याने सरपंचपदाची समीकरणे बदलली आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यापासून विजयी झालेल्या संबंधित प्रवर्गामधील सदस्यांकडून संख्याबळ जुळविण्यासाठी ताकद लावली जात आहे. विंचूर येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद नामाप्र वर्गासाठी राखीव असल्याने संबंधित प्रवर्गातील जवळपास चार ते पाच सदस्य सरपंचपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. सरपंचपदासाठी इच्छुक सदस्यांनी यापूर्वीच सुत जुळविण्याचे काम सुरू केले होते. सरपंचपद निवडीच्या दिवशी दगाफटका नको म्हणून त्यांची योग्य ती देखभाल घेत काही सदस्य गायब मोडवर असल्याचे चित्र आहे. मागचा अनुभव पाहता सरपंचपदाच्या निवडणुकीच्या वेळी ते वेळेवर उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. विंचूर ग्रामपंचायत सरपंचपद निवडणुकीसाठी सी. ए. पंडित यांची अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. माघारीची वेळ दीड ते दोन वाजेपर्यंत असून आवश्यकता असल्यास नियमाप्रमाणे दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रिया होणार आहे. एकूण सतरा सदस्यसंख्या असलेली विंचूर ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली बघता सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.