निवडणूक कर्मचाऱ्यांची उजळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:29 AM2019-09-24T01:29:19+5:302019-09-24T01:29:49+5:30

निवडणूक निर्विघ्न आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मतदानाच्या आणि मतमोजणीच्या काळातील दक्षता अधिक महत्त्वाची असून, यावेळी घेण्यात येणाया नोंदी या काटेकोर घेणे अपेक्षित आहे. ईव्हीएमचे प्रशिक्षण सर्व संबंधितांना देण्यात आलेले असल्याने कोणतीही चूक होता कामा नये.

 Election Staff Review | निवडणूक कर्मचाऱ्यांची उजळणी

निवडणूक कर्मचाऱ्यांची उजळणी

Next

नाशिक : निवडणूक निर्विघ्न आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मतदानाच्या आणि मतमोजणीच्या काळातील दक्षता अधिक महत्त्वाची असून, यावेळी घेण्यात येणाया नोंदी या काटेकोर घेणे अपेक्षित आहे. ईव्हीएमचे प्रशिक्षण सर्व संबंधितांना देण्यात आलेले असल्याने कोणतीही चूक होता कामा नये. कायदेशीर तरतुदींचे पालनदेखील केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिर येते विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने क्षेत्रीय अधिकारी, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ खर्च सनियंत्रण कामावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मांढरे बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशिया, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी कायदेशीर तरतुदी व भारत निवडणूक आयोगाचे निर्देश काळजीपूर्वक अवलोकन करून जबाबदारीने केले पाहिजे. कायद्याच्या चौकटीत काम करताना अचुकता आणि दक्षता अत्यंत महत्त्वाची आहे. कर्मचाºयांना यंत्रणेची सर्व माहिती आणि मशीनचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्मचााºयांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे.
उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना त्यांच्या जबाबदाºया व करावयच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने कायदा व त्यातील निवडणूक आयोगाचे निर्देश याबाबत खर्च नियंत्रण कक्षामध्ये नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी भारत निवडणूक आयोगाचे विविध सुविधांबाबत मार्गदर्शन केले. सीजीव्हील व्यवस्थेविषयीची माहितीदेखील देण्यात आली. या सुविधांचा लाभ कसा आहे याची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेनंतर निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आभार मानले.
निवडणूक कामाचा आढावा
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे निवडणूक कामाचा आढावा घेतला. निवडणूक कामासाठी लागणारे मनुष्यबळ आणि साहित्य याबाबतची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगून निवडणूक निर्णय अधिकाºयांनी कायदे व निवडणूक विषयक बाबींचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, असे सांगितले.
४पोलिसांनी संवेदनशील केंद्राची यादी तयार ठेवावी, असेही सांगितले. बैठकीत ईव्हीएम मशीन, निवडणूक खर्च, वाहनव्यवस्था, वाहतूक, सनियंत्रण, प्रमाणीकरण, कायदा व सुव्यवस्थापन प्रशिक्षण व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
४यावेळी संवेदनशील मतदानकेंद्रांची तसेच उपद्रवी घटकांची पडताळणी करून त्याबाबतची यादी तयार ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी पोलीस यंत्रणेला दिले.

Web Title:  Election Staff Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.