निवडणूक कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:28 AM2019-10-06T00:28:42+5:302019-10-06T00:30:37+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कामे नाकारण्यासाठी विविध आजारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करून निवडणूक शाखेकडून नेमणुका रद्द करून घेण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तपासण्याच्या सूचना निवडणूक अधिकाºयांनी दिल्या आहेत.

Election staff will examine the medical certificate | निवडणूक कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणार

निवडणूक कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणार

googlenewsNext
ठळक मुद्दे कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कामे नाकारण्यासाठी विविध आजारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करून निवडणूक शाखेकडून नेमणुका रद्द करून घेण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तपासण्याच्या सूचना निवडणूक अधिकाºयांनी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी ३५ हजार कर्मचाºयांची गरज असून, त्यासाठी सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालये, केंद्र सरकारच्या कार्यालयांचे कर्मचारी, अधिकाºयांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे; मात्र काही कर्मचाºयांनी निवडणुकीचे जोखमीचे काम नको म्हणून आजारपणाचे निमित्त करून वैद्यकीय दाखले देत निवडणूक ड्यूटी रद्द करण्यास सुरुवात केली आहे. दरररोज अशाप्रकारे शेकडो कर्मचारी विविध डॉक्टरांकडून आजारपणाची प्रमाणपत्रे सादर केली जात आहेत. धडधाकट कर्मचारीही वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेऊन निवडणूक ड्यूटी टाळत असल्याचे पाहून यापुढे अशा कर्मचाºयांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहे. त्यात जर वैद्यकीय प्रमाणपत्र खरे नसेल तर त्या कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Election staff will examine the medical certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.