स्थायी समिती सभापतिपदाची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:44+5:302021-07-29T04:15:44+5:30
आगामी वर्षात महानगरपालिकेची निवडणूक असल्याने शिवसेना व कॉंग्रेसची युती अडचणीची ठरू लागली आहे. हळूहळू वाद वाढू लागल्याने एमआयएमनेदेखील प्रखर ...
आगामी वर्षात महानगरपालिकेची निवडणूक असल्याने शिवसेना व कॉंग्रेसची युती अडचणीची ठरू लागली आहे. हळूहळू वाद वाढू लागल्याने एमआयएमनेदेखील प्रखर विरोधाची भूमिका घेतली आहे. पाठोपाठ स्थायी समिती सभापतिपदाचा कार्यकाळ व अंदाजपत्रकीय निधी वाटपावरून सत्तारूढ शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. महापालिकेतून कॉंग्रेसचे ४, भाजपचे २, शिवसेनेचा १, महागठबंधन आघाडीचा १ सदस्य निवृत्त होणार आहे. शिवसेनेच्या एका नगरसेविकेचा कोरोनाकाळात मृत्यू झाल्याने शिवसेनेचे समितीतील सदस्य संख्याही कमी होणार आहे.
इन्फो
काँग्रेसचे राहणार वर्चस्व
पक्षीय बलाबल पाहता सभापतिपदासाठी जफर अहमद अब्दुल्ला यांची निवड होण्याची शक्यता आहे. सत्तारूढ गटातील वादामुळे सभापतिपदाची निवडणूकदेखील रंगणार असून महापौरांनी आपल्या अधिकारात नूतन सदस्यांची नावे देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. शिवसेनेचे आता दोनच सदस्य असतील तर कॉंग्रेसच्या एका जादा सदस्याला संधी मिळणार असल्याने समितीत कॉंग्रेसचेच वर्चस्व राहणार आहे.