ज्येष्ठ शिवसैनिकांना विश्वासात घेऊन निवडणूक रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:40+5:302021-06-27T04:11:40+5:30
मनपा प्रभाग क्रमांक ७, १२, १३, १४, १५,१६,२३,३० मधील ज्येष्ठ शिवसैनिक,आजी-माजी पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी यांच्याशी शनिवारी शिवसेना ...
मनपा प्रभाग क्रमांक ७, १२, १३, १४, १५,१६,२३,३० मधील ज्येष्ठ शिवसैनिक,आजी-माजी पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी यांच्याशी शनिवारी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, वसंत गीते, विनायक पांडे यांनी शिवसेना कार्यालयात संवाद साधून मते जाणून घेतली त्यावेळी गीते बोलत होते. महानगरात ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. शिवसेनेत येण्यास कुणी तयार नव्हते त्याकाळात घरोघरी जावून शिवसेनेचे विचार आम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आणि संघटनवाढीसाठी प्रयत्न करणारे आणि वेळप्रसंगी आर्थिक झळ सोसणारे सैनिक आजही असल्याचे विनायक पांडे यांनी सांगितले. कोणत्याही पदांची अपेक्षा न बाळगता अहोरात्र फक्त पक्षाचाच विचार करणाऱ्या ज्येष्ठांना प्रवाहात आणणे आणि त्यांची मते जाणून घेणे या उद्देशानेच हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांनी अनेक मौलिक सूचना केल्या असून, त्याचा आदर बाळगला जाईल, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक, अण्णासाहेब लकडे, विजय पंजाबी, यतीन वाघ, सचिन मराठे, संजय चव्हाण यांच्यासह वसंतराव जेजुरकर, रमाकांत क्षीरसागर, सोमनाथ गुंबाडे, भीमा बागुल, शिवाजी बोंदाडे, राधेश्याम गायकवाड, मधुकर संधान, विलास घोलप, अरुण सैंदाणे, शरद इंगळे, विजय काकड, भीमा कोळी उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार करण्यात आला. (फोटो २६ सेना)