घोटी खुर्दच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 09:09 PM2021-03-05T21:09:13+5:302021-03-06T00:36:48+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या घोटी खुर्दच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड करण्यात आली.
न्यायालयीन खंडपीठाकडे सुनावणीसाठी असलेल्या प्रक्रियेमुळे रिक्त असलेल्या व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत बिन्नर व कैलास फोकणे यांचा अर्ज आल्याने छाननीनंतर एकही अर्ज बाद झाला नाही. उमेदवार फोकणे यांनी अर्ज केल्यानुसार गुप्त मतदान घेण्यात आले. नऊही सदस्य यावेळी उपस्थित होते. गुप्त मतदान प्रक्रियेत बिन्नर यांना पाच तर फोकणे यांना चार मते मिळाली. सर्वाधिक मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिन्नर यांना विजयी घोषित केले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच बिन्नर यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आवारी व ग्रामसेवक एस. खेबडे यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रोंगटे, निकिता लोहरे, मनीषा निसरड, बाळू जाधव,उद्धव रोंगटे, उमेश लोहरे, जगन जाधव, चंद्रभान जाधव, सोमनाथ निसरड, सुनील बिन्नर, लक्ष्मण लोहरे आदींसह वाडीव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील उपस्थित होते.