पेठ येथे कर्मचा-यांना निवडणूक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 04:11 PM2019-03-07T16:11:42+5:302019-03-07T16:13:31+5:30

प्रशासकीय तयारी : गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीसा

Election training for employees at Peth | पेठ येथे कर्मचा-यांना निवडणूक प्रशिक्षण

पेठ येथे कर्मचा-यांना निवडणूक प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देसमाधानकारक खुलासा सादर न केल्यास प्रशासकिय कारवाई करण्याच्या सुचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत.

पेठ - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर निवडणूक विभागाची प्रशासकिय यंत्रणा तयारीस लागली असून पेठ तालुक्यातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप अहेर, तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्यक्ष निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या प्रशिक्षण वर्गास विनापरवानगी गैरहजर असलेल्या निवडणूक कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. समाधानकारक खुलासा सादर न केल्यास प्रशासकिय कारवाई करण्याच्या सुचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब नवले, आर. व्ही. वराडे, तज्ज्ञ मार्गदर्शक रामदास शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
व्हीव्हीपॅट ठरले आकर्षण
या वेळच्या निवडणुकीत मतदान प्रक्रि या राबवतांना व्हीव्हीपॅट नवीन मशीन समाविष्ट करण्यात आले असून यामुळे मतदाराला मतदानाची खात्री पटणार आहे. या मशीन संदर्भात कर्मचा-यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष मशीन हाताळून प्रात्यक्षिकाद्वारे मशीनची कार्यप्रणाली समजून देण्यात आली. मतदारांबरोबरच कर्मचा-यांनाही या नव्या मशीनचे आकर्षण वाटले.

Web Title: Election training for employees at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.