अहेर पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
By Admin | Published: August 6, 2016 12:10 AM2016-08-06T00:10:29+5:302016-08-06T00:11:19+5:30
कळवण : अध्यक्षपदी नंदकुमार खैरनार, तर विसपुते उपाध्यक्ष
कळवण : डॉ. दौलतराव अहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाजपा नेते नंदकुमार खैरनार, तर उपाध्यक्षपदी उद्योजक भूषण विसपुते यांची आज संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा कळवणचे सहकार अधिकारी अविनाश खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कै. प्रमोद महाजन सभागृहात निवडणूक घेण्यात येऊन पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खैरनार, तर उपाध्यक्ष पदासाठी उद्योजक भूषण विसपुते यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी अविनाश खैरनार यांनी केली. कळवण तालुका कार्यक्षेत्र असलेल्या डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सन २०१६ ते २०२१ या पंचवार्षिकची संचालक मंडळाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली
सन २०१६ ते २०२१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खैरनार, पतसंस्थेचे विद्यमान
संचालक व भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, भूषण विसपुते, माजी सरपंच अजय मालपुरे, रोटरीचे सहप्रांतपाल विलास शिरोरे, उद्योजक मोहनलाल संचेती, कमकोचे माजी अध्यक्ष सुरेश कोठावदे, उद्योगपती रामदास दशपुत्रे, दिलीप कोठावदे, रामदास येवला, नामदेव जाधव, शिवदास शिवदे ,जिल्हा मजूर संघाच्या संचालक प्रतिभा शिरसाठ, अनिता खैरनार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक आण िमित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)