अपंग, ज्येष्ठ कर्मचार्यांना निवडणूक कामे देऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:27 PM2020-12-26T17:27:36+5:302020-12-26T17:28:21+5:30
सिन्नर : ग्रामपंचायत निवडणूक आदेश देताना महिला, अपंग, दुर्धर आजार असलेले, ५३ वर्षाच्या वरील, बालसंगोपन रजा घेतलेले कर्मचारी यांना निवडणूक आदेश देवू नयेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथ्लृमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणूकीसंदर्भात विविध मागण्यांचे तहसीलदारांना राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
कोरोना आजार उपचार घेत असलेले, विलगिकरणात असलेले आदींसह अडचणीत असलेल्या कर्मचार्यांना निवडणूक आदेश देऊ नयेत आदी मागण्या करण्यात आल्या.
निवडणूक, प्रशिक्षणाबाबत चर्चा करुन सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही, असे मत तहसीलदार राहुल कोताडे यांनी व्यक्त केले. यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष अशोक कासार, सरचिटणीस सुकदेव वाघ, कार्याध्यक्ष शिवाजी जाधव, कोषाध्यक्ष धारासिंग राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.