निवडणुकीचे पडघम वाजू लागले
By admin | Published: September 30, 2016 12:58 AM2016-09-30T00:58:55+5:302016-09-30T01:03:18+5:30
त्र्यंबकेश्वर : मतदार याद्या पुनरीक्षण
त्र्यंबकेश्वर : पुढील वर्षी सन २०१७ मध्ये त्र्यंबक नगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे वर्षभर अगोदरपासून निवडणूक मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दृष्टीने ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, अशांची मतदार याद्यात नावे नोंदवून घेण्याच्या दृष्टीने आज नगरपालिका सभागृहात मतदार-याद्यांचे पुनरीक्षणसाठी गावकरी, नगरसेवक आदिंची संयुक्त बैठक झाली.
बैठकीस निवासी नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थिताची सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अनेक शंका विचारल्या.
दरम्यान, १ जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर १६ या कालावधीत तहसीलदार त्र्यंबकेश्वर यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने नगरपालिका निवडणुकीकरिता जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने नगरपालिका स्तरावर आज संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित
होते.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या, तर व्यासपीठावर नायब तहसीलदार (निवडणूक) राजेंद्र कांबळे, संजय मिसर आदि उपस्थित होते. गावातील सुनील अडसरे, श्यामराव गंगापुत्र, गटनेता रवींद्र सोनवणे, नगरसेवक तृप्ती धारणे, अलका शिरसाठ, शकुंतला वाटाणे, सिंधू गमे, बांधकाम सभापती रवींद्र गमे, विष्णू दोबाडे, दिलीप
पवार, नगरसेवक योगेश तुंगार, सुरेश गंगापुत्र, सुरेंद्रबापू शुक्ल, माधुरी जोशी, दत्ता जोशी, मोहन झोले, हर्षल भालेराव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)