निवडणुकीत जनतेने भारिपला साथ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:41 AM2018-10-14T00:41:21+5:302018-10-14T00:42:21+5:30

आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तमाम आंबेडकरी जनतेने जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी येवला येथे बोलताना केले.

In the elections people should give Bharipala support | निवडणुकीत जनतेने भारिपला साथ द्यावी

निवडणुकीत जनतेने भारिपला साथ द्यावी

googlenewsNext
ठळक मुद्देमीराताई आंबेडकर : येवला येथील मुक्तिभूमीवर जाहीर सभा

येवला : आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तमाम आंबेडकरी जनतेने जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी येवला येथे बोलताना केले.
धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुक्तिभूमी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मीराताई आंबेडकर बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डी. एम. उबाळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष यू. डी. बोराडे, ज्येष्ठ नेते रूपवते, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, आगवणे, अनिकराव गांगुर्डे, भिवानंद काळे आदी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकरांनी येवला शहरात धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा करून जगाला समतेचा संदेश दिला आहे. आपण बौद्ध आहोत ही जाणीव सर्वांनी ठेवून बौद्धधम्माचे पालन करावे,
असे आवाहनही मीराताई आंबेडकर यांनी केले. यावेळी पवन पवार,
यू.डी. बोराडे, डी. एम. उबाळे, आगवणे, वि. म. रूपवते, अनिकराव गांगुर्डे, एम. आर. गांगुर्डे, भाऊसाहेब जाधव, डॉ. संजय जाधव आदींची भाषणे झाली.
दरम्यान मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
येऊन श्रामनेर शिबीरार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या निमित्ताने भिक्खु संघाच्या वतीने येवला
शहरातून प्रभातफेरी काढण्यात
येऊन शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी अनिकराव गांगुर्डे, भगवान साबळे, अमोल पगारे मारूती घोडेराव, छायाबाई साबळे यांच्यासह भीमसैनिकांनी परिश्रम घेतले.

Web Title: In the elections people should give Bharipala support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.