महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:01 AM2018-03-17T01:01:02+5:302018-03-17T01:01:02+5:30

महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता निवडणूक होत असून, भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके आणि शिवसेनेच्या संगीता जाधव यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान, वर्षभर भाजपाला साथ देणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला

Elections today for the post of chairman of the Standing Committee of Municipal Corporation | महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी आज निवडणूक

महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी आज निवडणूक

Next

नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता निवडणूक होत असून, भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके आणि शिवसेनेच्या संगीता जाधव यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान, वर्षभर भाजपाला साथ देणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असून, पक्षाचे सहयोगी सदस्य अपक्ष मुशीर सय्यद यांना तसा व्हीप बजावण्यात येणार आहे. मुशीर सय्यद यांनी ठरलेल्या करारनाम्यानुसार स्थायीच्या सदस्यत्वाचा राजीनामा न दिल्याने मुशीर सय्यद नेमके कोणाच्या गोटात जातात, याकडे लक्ष लागून असणार आहे. महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शनिवारी सकाळी अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. सभापतिपदासाठी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांना, तर शिवसेनेकडून संगीता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी समितीवर भाजपाचे सर्वाधिक ९, शिवसेनेचे ४, कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचा प्रत्येकी १ तसेच मनसेच्या कोट्यातून अपक्ष १ असे बलाबल आहे. समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने हिमगौरी अहेर-आडके यांची निवड जवळपास निश्चित आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला कॉँग्रेस-राष्टÑवादीने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. सेनेचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी मनसेचे कुणीही पदाधिकारी अथवा नगरसेवक उपस्थित नसल्याने मनसेच्या पाठिंब्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु, मनसेचे गटनेता सलीम शेख, शहराध्यक्ष अनिल मटाले, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांची बैठक होऊन शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपाला साथ दिल्याने भाजपाने आरोग्य समितीच्या उपसभापतिपदी मनसेचे योगेश शेवरे यांची वर्णी लावली होती. परंतु, मनसेने आता स्थायीच्या सभापतिपदासाठी सेनेची पाठराखण करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, मनसेच्या कोट्यातून स्थायीवर गेलेले सदस्य मुशीर सय्यद यांच्या घरी तसेच कार्यालयात व्हीप बजावण्यात आला असून, शनिवारी (दि. १७) सभागृहातही प्रत्यक्ष व्हीप बजावला जाणार असल्याची माहिती गटनेता सलीम शेख यांनी दिली आहे. मात्र, मुशीर सय्यद सभागृहात कोणती भूमिका निभावतात, याकडे लक्ष लागून आहे. त्यांनी भाजपाला साथ दिल्यास विरोधकांचे संख्याबळ ६ वर येणार आहे.
भाजपा सदस्य सहलीवर
स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या भाजपाच्या नऊ सदस्यांना शुक्रवारी मुंबईजवळील फार्महाउसवर नेण्यात आल्याचे समजते. उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले सभागृहनेता दिनकर पाटील तसेच उद्धव निमसे यांनाही सोबत नेण्यात आले आहे. शनिवारी सकाळी मतदानाच्या वेळेसच त्यांना नाशिकला आणले जाणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी करण्यात आली असून, आवश्यक तो पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

Web Title: Elections today for the post of chairman of the Standing Committee of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.