सत्तास्थाने नसताना जिंकली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:50 AM2019-10-02T01:50:20+5:302019-10-02T01:50:43+5:30

शिवसेनेकडून मी उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसैनिकांकडून करण्यात आला. माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने निवडणुकीचा खर्च शिवसैनिकांनी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून विधानसभेची माझी उमेदवारी निश्चित झाली.

Elections won without power | सत्तास्थाने नसताना जिंकली निवडणूक

सत्तास्थाने नसताना जिंकली निवडणूक

Next

म नमाड पालिकेचे नगरसेवक पद व शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत असताना १९९५च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. त्यावेळी तालुक्यात मनमाड नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक व पंचायत समितीचे विजय सांबरे हे एकमेव सदस्य ही सत्तास्थाने वगळता सर्वत्र कॉँग्रेसचे वर्चस्व होते. शिवसेनेकडून मी उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसैनिकांकडून करण्यात आला. माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने निवडणुकीचा खर्च शिवसैनिकांनी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून विधानसभेची माझी उमेदवारी निश्चित झाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये कॉ. माधवराव गायकवाड व जगन्नाथ धात्रक हे दोन माजी आमदार माझ्या विरोधात उभे होते. त्यांच्यासह अपक्ष म्हणून रोडू अण्णा पाटील हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही प्रबळ व बलाढ्य उमेदवारांपुढे आपल्यासारख्या सर्वसामान्य आणि नवख्या उमेदवाराचा टिकाव कसा लागणार असा प्रश्न समोर उभा होता. मात्र जनतेचा शिवसेनेवरील विश्वास व कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळे निवडणूक सोपी झाली. कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून प्रचारासाठी भाड्याने एक गाडी घेऊन दिली. त्या गाडीतून तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे, वाडे, वस्त्या पिंजून काढल्या. प्रचारासाठी मतदारांची भेट घेण्यासाठी गेल्यावर अनेक मतदारांकडून शुभेच्छा म्हणून हार व नारळ दिले जायचे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी तालुक्याला परिचित असल्याने लोकांनी पुढे हार व नारळ देण्याऐवजी पैशांच्या रूपात मदत देणे सुरू केले. शिवसेनेतील त्यावेळच्या माझ्या सहकाऱ्यांनी व सर्व शाखाप्रमुखांनी प्रचारासाठी जिवाचे रान केले. आर्थिक परिस्थिती नसतानाही केवळ शिवसैनिकांच्या बळावर व सहकार्यावर ती निवडणूक मी सहजगत्या जिंकली. राज्यात सर्वच मतदारसंघातील उमेदवारांकडून शिवसेनाप्रमुखांच्या झंजावाती सभांची मागणी करण्यात येत होती. केवळ योगायोगाने मतदानाच्या २४ तास आधी शिवसेनाप्रमुखांची मनमाडला सभा झाली आणि माझ्या अंगावर गुलाल पडला.
राजाभाऊ देशमुख

Web Title: Elections won without power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.