निवडणूक आचारसंहितेच्या चर्चांनी ‘एप्रिल फूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:19 AM2019-09-21T01:19:18+5:302019-09-21T01:20:53+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आदर्श आचारसंहिता लागू होऊ शकणार असल्याची चर्चा पंधरा दिवसांपासून त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर तर हमखास शुक्रवारीच (दि.२०) आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली.

Electoral Code of Conduct Discussions 'April Fools' | निवडणूक आचारसंहितेच्या चर्चांनी ‘एप्रिल फूल’

निवडणूक आचारसंहितेच्या चर्चांनी ‘एप्रिल फूल’

Next
ठळक मुद्देसभेनंतर अपेक्षा ठरल्या फोल : महापालिकेत धावपळशासकीय यंत्रणांचे आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आदर्श आचारसंहिता लागू होऊ शकणार असल्याची चर्चा पंधरा दिवसांपासून त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर तर हमखास शुक्रवारीच (दि.२०) आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली. निवडणूक आयोगाची दुपारी मुंबईत बैठक होणार असून, त्यानंतर तारखा घोषित होणार या शक्यतेने शासकीय कार्यालयात धावपळ वाढली. परंतु सर्व चर्चा एप्रिल फुल करणारी ठरली.
विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात होणार आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साधारणत: १४ किंवा पंधरा सप्टेंबर रोजी निवडणुका जाहीर होतील अशी चर्चा होती. त्यामुळे सर्वत्र धावपळ सुरू होती. महापालिका, जिल्हा परिषदेच्या सभादेखील अगोदरच घेण्यात आल्या. परंतु हा मुहूर्त टळला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमधील सभा संपली की दुसºयाच दिवशी हमखास आचारसंहिता लागू होतील अशी अटकळ बांधण्यात आली. त्यामुळे महापालिकेने तर तातडीने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान घोषित केले. तसेच शुक्रवारी (दि.२०) स्मार्ट सिटी कंपनीची बैठक ठेवली. निवडणूक आयोगाची दुपारी बैठक आणि त्यानंतर तारखा घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद होणार असल्याच्या चर्चा पसरल्या त्यामुळेदेखील धावपळ सुरू झाली. परंतु ही चर्चा केवळ अफवाच ठरली. अर्थात, त्यानिमित्ताने प्रलंबित कामे करण्यासाठीदेखील महापालिकेत नगरसेवक आणि ठेकेदारांची गर्दी होती.
म्हणून वाहतूक बेटाचे घाईघाईने भूमिपूजन
जुन्या नाशिक भागात एका वाहतूक बेटाचे भूमिपूजन दुपारी करण्याचा निर्णय संंबंधित प्रायोजकाने घेऊन नगरसेवकांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले. निवडणूक आयोग दुपारीच पत्रकार परिषदेत आचारसंहिता लागू करेल म्हणून या प्रायोजकाने संबंधित नगरसेवकांना सारखे फोन करून भंडावून सोडले अखेरीस भूमिपूजन वेळेत झाले. परंतु आचारसंहिता मात्र लागू झाली नाही.

Web Title: Electoral Code of Conduct Discussions 'April Fools'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.