नाशकात इलेक्ट्रीक बसचे मार्केंटीग पडले महागात
By संजय पाठक | Published: June 21, 2019 04:33 PM2019-06-21T16:33:06+5:302019-06-21T16:35:41+5:30
नाशिक- महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे बसची खरेदी करण्यात आली नसताना केवळ दक्षीणेतील एका शहरात नेली जाणारी बस तरण तलावा जवळ थांबवून त्यावर नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा फलक लावून मार्केटींग करणाऱ्या संबंधीत कंपनीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक- महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे बसची खरेदी करण्यात आली नसताना केवळ दक्षीणेतील एका शहरात नेली जाणारी बस तरण तलावा जवळ थांबवून त्यावर नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा फलक लावून मार्केटींग करणाऱ्या संबंधीत कंपनीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक महापालिकेच्या वतीने बस सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या आहेत. यात इलेक्ट्रीक तसेच डिझेल आणि सीएनजी बसचा समावेश आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सक्षम करण्याचे प्रयत्न असले तरी स्मार्ट सिटी कंपनीचा मात्र यात कोणताच संबंध नाही. दरम्यान, गुरूवारी (दि.२०) जेबीएम सोलर कंपनीची एक बस स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळ थांबली यावेळी त्यावर नाशिक स्मार्ट सिटी विथ वर्ल्ड क्लास ट्रांसपोर्ट असा फलक लावण्यात आला. त्यामुळे कंपनीच्या नावामुळे आणि फलकामुळे नाशिककरांचा गोंधळ उडाला. अनेक नागरीकांनी बसचे छायाचित्र काढून नाशिक महापालिका सोलरवर बस सेवा सुरू करणार असून त्यासाठी बस दाखल झाल्याच्या पोस्ट या बसच्या फोटोंसह सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या.
महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांनी सुरूवातीला अनभिज्ञता दर्शवली. परंतु नंतर एका कंपनीने नाशिकमधून अन्य शहरात नेली जाणारी इलेक्ट्रीकची बस बघून घ्या असे नमुद केल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही या बसने नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा वापर कसा काय केला याबाबत शंका उपस्थित केली जात होती तसेच अनेक प्रकारचे संशय देखील व्यक्त होत होते. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संंबंधीत कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शुक्रवारी (दि.२०) दिले.