गणेश मंडळांचा विद्युत रोषणाई, फुलांच्या देखाव्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:19 AM2021-09-15T04:19:49+5:302021-09-15T04:19:49+5:30

नाशिक : गणपती बाप्पा म्हटला की कुणाच्याही अंगात उत्साह संचारतो. दहा दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवात आबालवृद्ध भक्तीने न्हाऊन ...

Electric lighting of Ganesh Mandals, emphasis on the appearance of flowers | गणेश मंडळांचा विद्युत रोषणाई, फुलांच्या देखाव्यावर भर

गणेश मंडळांचा विद्युत रोषणाई, फुलांच्या देखाव्यावर भर

Next

नाशिक : गणपती बाप्पा म्हटला की कुणाच्याही अंगात उत्साह संचारतो. दहा दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवात आबालवृद्ध भक्तीने न्हाऊन निघतात. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवांचे देखावे पाहण्यासाठी रस्त्यांवरून ओसंडून वाहणारी गर्दी असते. मात्र मागील वर्षापासून या साऱ्याला फाटा देत नाशिकमधील गणेशोत्सव मंडळांनी विद्युत रोषणाई व रेडीमेड फुलांची आरास करून गणरायाची स्थापना केली आहे.

नाशिककरांकडून कोरोनाच्या साथीमुळे अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने गणरायाच्या दर्शनासाठी जमणारे भाविकही या आनंदाला मुकले आहेत. गणरायाची स्थापना झाली असली तरी कोरोना प्रतिबंधामुळे शहरातील मोठ्या मंडळांनी चलचित्र व देखावे उभारण्याचे टाळले आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गणेशोत्सव साजरा करताना मार्गदर्शक सूचना करण्यात आली आहे. यात मंडळांत गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्षात मंडपात येऊन दर्शनासाठी प्रतिबंध करण्यात आला असून केवळ ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शन घेण्याची सूचना करण्यात आल्याने या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केवळ विद्युत रोषणाई व रेडीमेड फुलांची आरास सजविली आहे. विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बी. ड. भालेकर मैदानावर विविध ८ औद्योगिक व अन्य मंडळांच्या गणपतींचे देखावे असतात. परंतु या ठिकाणीही या वर्षी संयुक्तरीत्या एकच तांब्याच्या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

इन्फो-

मंडळांचा सामाजिक उपक्रमांवर भर

नाशिक शहरातील विविध गणेश मंडळांनी या वर्षी आकर्षक देखाव्यांना फाटा देत सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला असून यातील काही मंडळांनी कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती, लसीकरण शिबिर व आरोग्य शिबिरांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले आहे.

Web Title: Electric lighting of Ganesh Mandals, emphasis on the appearance of flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.