गणेश मंडळांचा विद्युत रोषणाई, फुलांच्या देखाव्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:42+5:302021-09-16T04:18:42+5:30
नाशिक : गणपती बाप्पा म्हटला की कुणाच्याही अंगात उत्साह संचारतो. दहा दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवात आबालवृद्ध भक्तीने न्हाऊन ...
नाशिक : गणपती बाप्पा म्हटला की कुणाच्याही अंगात उत्साह संचारतो. दहा दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवात आबालवृद्ध भक्तीने न्हाऊन निघतात. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवांचे देखावे पाहण्यासाठी रस्त्यांवरून ओसंडून वाहणारी गर्दी असते. मात्र, मागील वर्षापासून या साऱ्याला फाटा देत नाशिककरांकडून कोरोनाच्या साथीमुळे अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने गणरायांच्या दर्शनासाठी जमणारे भाविकही या आनंदाला मुकले आहेत.
नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. १०) गणरायांची स्थापना झाली असली तरी कोरोना प्रतिबंधामुळे शहरातील मोठ्या मंडळांनी चलचित्र व देखावे उभारण्याचे टाळले आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गणेशोत्सव साजरा करताना मार्गदर्शक सूचना करण्यात आली आहे. यात मंडळांत गणेश मूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्षात मंडपात येऊन दर्शनासाठी प्रतिबंध करण्यात आला असून, केवळ ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शन घेण्याची सूचना करण्यात आल्याने