रब्बी पिकांना विजेचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 02:25 PM2020-02-03T14:25:19+5:302020-02-03T14:25:52+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत. भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गेल्या काही दिवसापासून वीज गायब असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी चांगल्या प्रमाणात पिके घेतली आहेत. काही शेतकºयांच्या शेतात पाणी भरण्याच्या आत वीज गायब होत आहे. सध्या तापमानात वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच वीज वितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका नगदी पिकांना बसत आहेत. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. नांदूरशिंगोटे, दापूर, चास आदी भागात शनिवारी (दि.१) ला ९ तास वीज पुरवठा खंडीत होता. तर रविवारी सकाळी ९ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वीज गायब होती. तसेच नळवाडी गावाला नांदूरशिंगोटे व चास येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या भागात केव्हाही वीज गायब होेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नळवाडी गावातील काही भागात सोनेवाडी भागातील वीजेची लाईन जोडल्याने या ंिठकाणी वीजपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचा आरोप नळवाडी ग्रामस्थांनी केला आहे. नळवाडी शिवारात २४ रोहित्र असून त्यापैकी ११ रोहित्र दुसरीकडे जोडण्याची मागणी तेथील शेतकºयांनी केली आहे. वीज पुरवठा खंडीत असल्याने येथील शेतक-यांनी नांदूरशिंगोटे कार्यालयात धाव घेवून आपले गाºहाणे मांडले. यावेळी माजी उपसरपंच सुदाम दराडे, दत्तात्रय दराडे, नितीन दराडे, निवृत्ती सानप, भागवत सहाणे, भाऊसाहेब दराडे, भारत दराडे, मच्छींद्र दराडे, बाळासाहेब दराडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
--------------
चौकट- भोजापूर खोरे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहेत. विजेचा लंपडाव सुरू असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याकरिता जाणाºया शेतक-यांमध्ये गीतीचे वातावरण तयार झाले आहे. नळवाडी शिवारात दिवसा कमी दाबाने विजपुरवठा होत असल्याने विजपंप सुरळीत चालत नाही. त्यामुळे त्याचा फटका रब्बी पिकांना बसत आहे.
-सुदाम दराडे, माजी उपसरपंच, नळवाडी
---------------------
शनिवारी सिन्नरहून नांदूरशिंगोटे येणाºया विजवाहिनीच्या मुख्य वीजवाहक तारा तुटल्याने तसेच रविवारी सकाळी वीजेचा लोड वाढल्याने विज पुरवठा खंडीत झाला होता. रविवारी दुपारनतंर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विजेचा दाब वाढू नये यासाठी प्रत्येक फिडर वाईज नियोजन करण्यात आले आहे.
-आर. एस. भगत, सहाय्यक अभियंता.