जिल्हा बॅँक शाखांमध्ये वीजबिल भरणा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:04 AM2018-10-27T01:04:29+5:302018-10-27T01:05:02+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकआर्थिक अडचणी आल्याने बँकेच्या शाखांमधील बंद करण्यात आलेले वीजबिल भरणा (वसुली) केंद्र सुरू करण्यात आले असून, सोमवारपासून बँकेच्या १७५ शाखांमध्ये हे वीजबिल भरणा केंद्र सुरू झाल्याने सुमारे तीन लाखांचा वीज बिल भरणा झाला आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकआर्थिक अडचणी आल्याने बँकेच्या शाखांमधील बंद करण्यात आलेले वीजबिल भरणा (वसुली) केंद्र सुरू करण्यात आले असून, सोमवारपासून बँकेच्या १७५ शाखांमध्ये हे वीजबिल भरणा केंद्र सुरू झाल्याने सुमारे तीन लाखांचा वीज बिल भरणा झाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेने, बँकेच्या शाखांमधील वीज बिल भरणा (वसुली) केंद्रात जमा झालेली रक्कम वेळात महावितरणकडे जमा केली नव्हती. त्यावर, महावितरण कंपनीने जिल्हा बँकेविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच बँकेचे वीज बिल भरणा केंद्रे करण्यात आले होते. हे केंद्र बंद केल्याने अतिदुर्गम भागातील शेतकरी सभासदाची बिल भरण्यासाठी गैरसोय होत असल्याने केंद्र सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत होते. त्यासाठी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला. यात महावितरणने सकारात्मक प्रतिसाद दिला. बँकेचे व महावितरणचे पूर्वीचे व्यवहार विचारात घेऊन बँकेच्या शाखामधील वीज केंद्र पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी अध्यक्ष केदा अहेर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती.