स्वस्त दरात मिळणार वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 05:43 PM2019-05-17T17:43:26+5:302019-05-17T17:45:03+5:30

कृषीपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकर्यांच्या बहुप्रतिक्षीत मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात आला.

Electricity at cheap rates | स्वस्त दरात मिळणार वीज

लासलगाव येथील महावितरणचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला त्यावेळी उपस्थित मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर. समवेत अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंते मधुसूदन वाढे, सुरेश सवाईराम, मनीष ठाकरे, अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता प्रवीण सोनवणे आदी.

Next
ठळक मुद्देतीन मेगावॉट क्षमता लासलगावी राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प

लासलगाव : कृषीपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकर्यांच्या बहुप्रतिक्षीत मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात आला.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजने अंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात आला. जिल्ह्यात सध्या तीन प्रकल्पांमधून तीन मेगावॉटपेक्षा अधिक सौरऊर्जा निर्माण होत आहे. महानिर्मिती व महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक व खासगी सहकार्यातून या योजनेतील प्रकल्प कृषिपंप वापर अधिक असलेल्या ठिकाणी उभे राहत आहेत.
लासलगाव उपकेंद्र परिसरात जवळपास २० हजार चौरसमीटर जागेवर उभारण्यात आलेला १.३ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प आहे. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंते मधुसूदन वाढे, सुरेश सवाईराम, मनीष ठाकरे, अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता प्रवीण सोनवणे यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
प्रकल्पाचे लाभ
कृषी वाहिनीतून मिळणारी वीज ही पारंपरिक विजेपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.पारंपरिक वीज निर्मिती केंद्र उभारण्यासाठी लागणार्या कालावधीच्या तुलनेत सौर कृषी वाहिनी उभारण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो. त्यामुळे सौर कृषी वाहिनी उभारणीचे काम अधिक गतीने होऊ शकते. दिवसा वीज उपलब्ध झाल्याने शेतकर्यांना रात्री-अपरात्री सिंचनासाठी शेतात जाण्याची गरज उरत नाही. योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकर्यांमध्येही समाधानाचे वातावरण राहील. स्वस्त दरात वीज उपलब्ध होत असल्याने सवलतीपोटी देण्यात येणार्या सरकारी अनुदानाच्या (क्र ॉस सबिसडी) रकमेतही बचत होणार आहे. पर्यावरणपुरक उर्जेमुळे प्रदुषण नियंत्रीत ठेवण्यात प्रकल्प मोलाचे ठरतील. एकूणच प्रकल्पाचे फायदे शेतकर्यांना दिलासादायक तर पर्यावरणाला संरक्षण देणारे ठरतील.
यापूर्वी वावी येथे ०.७३ मेगावॉट क्षमतेचा व वणी येथील ०.९९ क्षमतेचा प्रकल्प सुरू झाले आहेत. याशिवाय गिरणारे उपकेंद्र परिसरात ०.७९ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
राज्यात महावितरणकडून वितरित होणार्या एकूण वीज वापरापैकी जवळपास 30 टक्के वीज ही कृषीपंपासाठी वापरली जाते. महावितरणकडून सवलतीच्या दरात ही वीज शेतकर्यांना उपलब्ध करून देण्यात येते. पारंपरिक पद्धतीने सध्या कृषीपंपांना चक्र ाकार पद्धतीने दिवसा 8 तर रात्री 10 तास वीज पुरवठा होतो. दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची शेतकर्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी तसेच कृषी क्षेत्राला माफक दरात व आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली. महानिर्मिती व महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक व खासगी सहकार्यातून या योजनेतील प्रकल्प कृषिपंप वापर अधिक असलेल्या ठिकाणी उभे राहत आहेत. सरकारी, गावठाण, शेतकर्यांच्या खडकाळ व पडीक जमीनी आदी ठिकाणी प्रकल्प उभे केले जात आहेत. याशिवाय महावितरणच्या उपकेंद्र तसेच इतर ठिकाणी असलेल्या जागेवरही प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

Web Title: Electricity at cheap rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.