अंदाजे वाढीव बिल देऊन वीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 07:32 PM2020-06-21T19:32:04+5:302020-06-21T19:32:36+5:30
सायखेडा : मार्च महिन्यापासून सलग तीन महिने वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी ग्राहकांच्या घरी येऊन रीडिंग न घेताच युनिटअंदाजे टाकून अवाच्या सव्वा बिल ग्राहकांना दिल्याने अडचणीच्या काळात वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक दिला आहे.

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉक डाऊन सुरू करण्यात आले होते. लॉकडाउनच्या काळामध्ये वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी थेट ग्राहकांच्या घरी मीटर मध्ये बिल घेण्यासाठी आला नाही.
तीन महिन्यानंतर ग्राहकांना काही दिवसांपासून बिल येण्यास सुरु वात झाली आहेत, मात्र हे तीन महिन्याचे सलग एकाच वेळेस बिल आले असून सदर बिल हे मोठ्या प्रमाणात वाढीव आले असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ग्राहकांना महिन्याला दोनशे तीनशे रु पये येत होते त्यांना तीन महिन्याचे सलग तीन हजार रु पयापर्यंत बिल आकारण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये घरगुती वापरावयाची विज अतिशय कमी प्रमाणात वापरली जाते. जास्त वीज खर्च होईल असे कोणत्याही प्रकारचे उपकरण ग्रामीण भागातील लोकांकडे नाही.
वीज वितरण कंपनीने युनिटची शहानिशा करून योग्य ती वीज बिलाची आकारणी करावीअन्यथा वीज बिल भरणा असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे वितरण कंपनीने तात्काळ मागील युनिट नुसार बिल द्यावी वाडी वाले बिल कोणी भरणार नाही अशी चर्चा ग्राहकांमध्ये सुरू आहे