कनेक्शन देण्यापूर्वीच शेतकऱ्याला वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:56 AM2018-07-02T00:56:55+5:302018-07-02T00:57:49+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील एका शेतकºयाला कुठल्याही प्रकारची वीजजोडणी न देता विजबील आल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्याच्या स्थितीत सर्व विभागांचे सर्वच कारभार आॅनलाइन झाले आहेत. यामुळे पारदर्शकता अनुभवाला येत असली तरी वीज वितरण कंपनीचा कारभार अजूनही बदलाच्या प्रवाहात आल्याचे दिसत नाही.

Electricity to the farmer before giving the connection | कनेक्शन देण्यापूर्वीच शेतकऱ्याला वीजबिल

कनेक्शन देण्यापूर्वीच शेतकऱ्याला वीजबिल

googlenewsNext
ठळक मुद्देआजपर्यंत वीज मंडळाने तीन बिले आकारली आहेत.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील एका शेतकºयाला कुठल्याही प्रकारची वीजजोडणी न देता विजबील आल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्याच्या स्थितीत सर्व विभागांचे सर्वच कारभार आॅनलाइन झाले आहेत. यामुळे पारदर्शकता अनुभवाला येत असली तरी वीज वितरण कंपनीचा कारभार अजूनही बदलाच्या प्रवाहात आल्याचे दिसत नाही.
साकूर येथील आदिवासी शेतकरी गोपाळ सदू आवारी हे वयस्कर असून, त्यांना दोन मुली आहेत. एकीचे लग्न झाले तर एक उच्चशिक्षण घेत आहे. म्हातारपणात त्यांना कोणताही आधार नाही. शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे पडीक जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी आवारी यांनी विज मंडळाकडे ३ अश्वशक्तीचे अधिकृत कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज करून त्यासाठी आवश्यक ५ हजार २०० रु पयांची रक्कम २१ मे २०१५ रोजी भरली आहे. यानंतर कंपनीने त्यांना कागदोपत्री वीज कनेक्शन मंजूर केले. पण प्रत्यक्षात मात्र तब्बल तीन वर्षे उलटूनही शेतावर वीज कनेक्शन उपलब्ध झालेले नाही. मात्र आवारी यांचेकडून लाभ न दिलेल्या विजेच्या बिलाची आकारणी करून २० नोव्हेंबर २०१७ या तारखेला १ हजार ५८० रु पयांचे पहिले विजबिल दिले आहे. एवढेच नव्हे तर आजपर्यंत वीज मंडळाने तीन बिले आकारली आहेत.
या अन्यायाविरूद्ध आवारी यांनी महावितरण कंपनीच्या नाशिक येथील वरिष्ठ कार्यालयात रीतसर अर्ज देऊन वरिष्ठ कार्यालयासह कार्यकारी अभियंता इगतपुरी ग्रामीण तालुका कार्यालयासही अर्जाची प्रत देऊन पोहोच घेतलेली आहे. परंतु यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही.  आवारी वृद्धापकाळात कार्यालयाचे उंबरठे झिजवून हतबल झाले आहेत. या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून मला न्याय मिळवुन द्यावा असे आवाहन गोपाळ आवारी यांनी केले आहे.

Web Title: Electricity to the farmer before giving the connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.