विजेअभावी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:33 PM2019-12-27T23:33:30+5:302019-12-27T23:34:22+5:30

वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Electricity farmers suffer | विजेअभावी शेतकरी त्रस्त

विजेअभावी शेतकरी त्रस्त

Next
ठळक मुद्देपांगरी : पिकांना पाणी देण्यासाठी पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची मागणी

पांगरी : वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची म्हणजे गहू, मका तसेच जनवारांच्या चाºयाची लागवड केली आहे, परंतु पिकांना पाणी देणे शेतकºयांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. वीज खंडित होण्याचे प्रमाण ही वाढल्याने वाफ्यापर्यंत पाणी पोहोचण्याअगोदर वीज जाते. त्यामुळे विहीर ते वाफ्यापर्यंत शेतकरी चकरा मारून हैराण झाला आहे. पाणी भरण्यासाठी दोन व्यक्तीची गरज भासू लागली असून, एक शेतात तर दुसºयाला स्टार्टरजवळ उभे राहावे लागत आहे.
सध्या शेतकºयांना शेतीसाठी रविवारी ते मंगळवार रात्री ८.०५ ते सकाळी ६.०५ वाजेपर्यंत, तर गुरुवार ते रविवार सकाळी ७.२० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत वीज असते, परंतु रात्री दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसाच्या वेळी देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. रात्री अंधारामुळे हिंस्रपशू तसेच साप, विंचू सारखे विषारी प्राण्यांच्या दहशतीखाली शेतकºयाला रात्री शेतीत पाणी भरावे लागते.
शेतीसाठी दिवसाच वीज द्यावी तसेच पूर्ण दाबाने वीज देण्याची मागणी बाबासाहेब शिंदे, अशरफ कादरी, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार, प्रकाश पांगारकर, संदीप पगार, भाऊसाहेब पगार, प्रवीण शिंदे, सुनील
निरगुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.
कमी दाबाचा पुरवठा वीज उपकरणे बंद
वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक वीज उपकरणे बंद आहेत. त्यामुळे वीज असूनही उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे जळून नुकसान होत आहे. मोटर जळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकºयाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
पांगरी व परिसरात गावामध्ये अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत आहे. वीज मंडळाकडून वीजबिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीजबिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने दिली जात आहे. शेतकºयांवर हा अन्याय आहे.
- संजय वारुळे, उपाध्यक्ष, विकास संस्था, पांगरी
ग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते, परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाउणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.
- आत्माराम पगार, सिन्नर तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Web Title: Electricity farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार