वीज कोसळून बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 10:11 PM2017-10-08T22:11:43+5:302017-10-08T22:12:00+5:30
देवळा : शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेपासून विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पिंपळगाव (वा.) येथे वीज कोसळून एक बैल ठार झाला. तसेच फ्रीज, इन्व्हर्टर, टीव्ही आदी विद्युत उपकरणे जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतात कापणी करून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता; पावसाचे कुठलेही चिन्ह नसताना रविवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. तालुक्यातील अनेक भागात वीज कोसळली. पिंपळगाव शिवारातील रण्यादेव हुडी येथे सुकदेव वाघ यांच्या शेतात वीज पडून घराशेजारील बैलाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात वाघ यांचे सत्त्यात्तर हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतकºयांनी शेतात कापणी करून ठेवलेली खरीप पिके व आॅक्टोबरच्या उन्हात वाळत घातलेले धान्य भिजल्याने शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खारगे, तलाठी डी. व्ही. कदम. पोलीस पाटील योगेश वाघ, उपसरपंच नदीश थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.