पिंपळगाव लेप येथे वीजप्रश्नी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:38+5:302021-02-05T05:35:38+5:30
वीजबिल थकबाकी वसुली जर ग्रामपंचायतीने केली तर त्यापोटी प्रति वीजबिल पाच रुपये देण्यात येईल. पुढील तीन वर्षांत ग्राहक आणि ...
वीजबिल थकबाकी वसुली जर ग्रामपंचायतीने केली तर त्यापोटी प्रति वीजबिल पाच रुपये देण्यात येईल. पुढील तीन वर्षांत ग्राहक आणि शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता सर्व कृषी ग्राहकांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याचे महावितरणने नियोजन केल्याचे उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस एस. एस. दाणे, सचिन कमोदकर, दिलीप दौंडे, केशव पोटे, मधुकर साळवे, माणिकराव रसाळ, दिंगबर दौंडे, मधुकर ढोकळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र जाधव, पोपट ढोकळे, मिलिंद सबनीस, बापू पोटे, रामनाथ दौंडे, संतोष ढोकळे, सुनील ढोकळे, बाबासाहेब दाभाडे, अर्जुन बिडवे, कैलास रसाळ, गोरख दौंडे, साहेबराव दौंडे, भाऊसाहेब रसाळ, गणपत काळे, अतिश दुनबळे, निवृत्ती दुनबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.