अडीचशे शाळांना मिळणार एकाच दिवसात वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:02 AM2017-09-12T00:02:41+5:302017-09-12T00:02:50+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या तब्बल २३८ शाळांना एकाच दिवसात वीजजोडणी मिळण्याची सुचिन्हे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेत महाराष्टÑ विद्युत वितरण कंपनीला यासंदर्भात आदेश दिले.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या तब्बल २३८ शाळांना एकाच दिवसात वीजजोडणी मिळण्याची सुचिन्हे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेत महाराष्टÑ विद्युत वितरण कंपनीला यासंदर्भात आदेश दिले.
दरम्यान, यासंदर्भात १६ जुलै २०१७ च्या ‘लोकमत’मध्ये निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या ‘सारांश’ या स्तंभात मांडण्यात आलेल्या ‘डिजीटलायझेशन चांगलेच पण...’ या वस्तुस्थितीची नोंद घेत अध्यक्ष शीतल सांगळे यांनी त्यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात वीज विभागाच्या अधिकाºयांना स्वतंत्र बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ही बैठक सोमवारी (दि.११) सांगळे यांच्या कक्षात झाली. बैठकीस महाराष्टÑ वीज विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुनील पावडे, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे आदी उपस्थित
होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सुमारे २३८ प्राथमिक शाळांना अद्यापपर्यंत वीजजोडणीच नाही त्या शाळांना तत्काळ वीजजोडणी कशी करता येईल, अशी विचारणा शीतल सांगळे यांनी केली. त्यावर संबंधित शाळांनी ए-वन हे अर्ज जोडणीचे फॉर्म तत्काळ भरल्यास एका दिवसात वीज देण्याचे मुख्य अभियंता पावडे यांनी मान्य केले. त्यावर सांगळे यांनी या २३८ शाळेच्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना तत्काळ हे फॉर्म एका दिवसात भरून वीजजोडणी घेण्याचे आदेश प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हसकर यांना दिले. त्यांनी हा निरोेप शाळांना दिला. मंगळवारी (दि.१२) संबंधित २३८ शाळा वीज मंडळाकडे ए-वन फॉर्म भरून देणार असून, या शाळांना एका दिवसात आता वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती अध्यक्ष सांगळे यांनी दिली.