देवगाव परिसरात बसविले विद्युत खांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:23 PM2020-06-25T22:23:44+5:302020-06-25T22:24:24+5:30
देवगाव : परिसरात महावितरण विभागाने जुन्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन खांब बसवले. तसेच विद्युतवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली आहे. ‘लोकमत’मध्ये १५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच महावितरण विभागाला जाग आली असून, या कामांना मुहूर्त लागला आहे. यामुळे देवगाव परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जून महिन्याच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्र्रीवादळ, वाऱ्यासह देवगाव परिसरात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युतवाहक तारांवर कोसळून विद्युतप्रवाह खंडित झाला होता. ठिकठिकाणी तारा तुटल्याने, खांब वाकल्याने विजेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.दि. १५ जून रोजी लोकमतमध्ये ‘वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित’ या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल महावितरण विभागाने घेतली. नवीन तारा, खांब बसवल्याने व झाडांच्या फांद्याची छाटणी करून महावितरण विभागाने नागरिकांच्या समस्येवर तोडगा काढल्याने देवगाव परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.