वीज कामगाराचा शॉक लागून मृत्यू

By Admin | Published: September 27, 2015 12:12 AM2015-09-27T00:12:35+5:302015-09-27T00:12:58+5:30

वीज कामगाराचा शॉक लागून मृत्यू

Electricity Shock Death | वीज कामगाराचा शॉक लागून मृत्यू

वीज कामगाराचा शॉक लागून मृत्यू

googlenewsNext

नाशिक : मखमलाबाद शाळेजवळील विद्युत रोहित्राची दुरुस्ती करताना शॉक लागून प्रशिक्षणार्थी कामगाराचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात दुपारी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ मयत कर्मचाऱ्याचे नाव प्रवीण मोहन पगारे (३०, रा़ मखमलाबाद लिंकरोड, मूळ राहणार उमराळे, ता़ दिंडोरी) असे आहे़
मखमलाबाद शाळा व राजवाडा यामध्ये असलेल्या विद्युत रोहित्राची दुरुस्ती करताना सकाळी १०.३० वाजता विजेचा धक्का लागल्याने तो खाली कोसळला़ या घटनेची माहिती मिळताच शेजारी असलेल्या पिंगळे कुटुंबीयांनी जखमी प्रवीणला स्वत:च्या मोटारीने रुग्णालयात दाखल केले. जखमी पगारेस प्रारंभी गोविंदनगर येथील एका खासगी व नंतर जिल्हा रुग्णालयात हलविले असता दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ मयत प्रवीणच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे़ यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity Shock Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.