पाण्यात जीवाची बाजी लावत वीजपुरवठा केला सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 03:57 PM2020-01-07T15:57:52+5:302020-01-07T15:58:00+5:30
खेडगाव/वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तिसगाव धरणाच्या पाण्यात उतरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत तारेची दुरूस्ती ...
खेडगाव/वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तिसगाव धरणाच्या पाण्यात उतरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत तारेची दुरूस्ती करण्यात यश मिळविले.
शिंदवड या गावी जाणारी विद्युत वाहिनीची ब्रेक डाऊन झाली. त्या नंतर सर्व कर्मचाºयांनी शिंदवड गावापासून पेट्रोलींग करत असता धरणाच्या फुगवट्याजवळ विजतार दोन गाळ्यामधील खांबावर तुटलेली दिसुन आली. त्यामुळे शिंदवड गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ज्या ठिकाणी वायर तुटली त्या खांबाजवळ तिसगाव धरणाच्या पाण्याचा फुगा असल्याने त्याठिकाणी सुमारे पंधरा ते वीस फुट पाणी होते. त्यामुळे तिथे काम करणे खुपच धोक्याचे व अंगावर शहारे आणणारे होते. तरीही गावातील विजपुरवठा सुरू करण्यासाठी वायर ओढणे खुप गरजेचे होते. पिपंळगाव येथील उप कार्यकारी अभियंता कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडगाव क्षेत्रातील कर्मचारी कांतिलाल राठोड, रामेश्वर लोहकरे, विनायक गायकवाड यंत्र चालक,गोविंद बबनराव आव्हाड (खेडले), प्रकाश बहिरम,विनोद गांगुर्डे,गुंबाडे आण्णा, प्रविण नागरे,रवींद्र पवार, प्रकाश देशमुख,ज्ञानेश्वर गायकवाड,सुनिल धुळे या सर्वांनी परिश्रमाने व विविध अडचणीवर मात करून काम पुर्ण केले. गायकवाड हे यंत्रचालक असुन त्यांची ड्यूटी संपलेली असतांनाही त्यांनी साईटवरील तारा ओढण्यासाठी मदत केली.