वीजकामगारप्रश्नी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:15 AM2018-07-09T00:15:48+5:302018-07-09T00:16:38+5:30
नाशिकरोड : महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात इलेक्ट्रीसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या वतीने विद्युत भवन येथे निदर्शने करून द्वारसभा घेण्यात आली.
नाशिकरोड : महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात इलेक्ट्रीसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या वतीने विद्युत भवन येथे निदर्शने करून द्वारसभा घेण्यात आली.
महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शनिवारी वीज भवन येथे कामगारांनी निदर्शने केली. यावेळी झालेल्या द्वारसभेत असोसिएशनचे विभाग उपाध्यक्ष अन्वर तडवी यांनी मार्गदर्शन करून सोमवारी होणाऱ्या एकदिवसीय आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वाहिनी कामगारांचा वेतनगट तीनमध्ये समावेश करावा, ग्रामीण भागातील कामाचे आठ तास करावे. शहारातील तक्रार निवारण्यासठी शिडी असलेली गाडी उपलब्ध करून द्यावी, गाव तेथे लाइनमन ही संकल्पना राबवावी, निवृत्तवेतन मिळावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी सल्लागार बाळासाहेब भास्करे, सचिव तेजस बनकर, नासेर काझी, महिला संघटक राणी वाघ, वासुदेव चाटे, दौलत तुंगार, सचिन तुपे, प्रकाश वाघ, रीतेश पाटील आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
प्रशासनच्या बदलीविषयी धोरणातील मनमानी बंद करून परिमंडलनिहाय सर्व स्तरावरील कर्मचाºयांना विनंती बदल्या कराव्यात, पेट्रोल भत्ता वीस लिटर देण्यात यावा, फिडर मेन्टेनन्स, ब्रेकडाउनच्या कामाला जाण्यासाठी अभियंत्यांना परमिट घेण्याची जबाबदारी द्यावी, वाहिनी कामगारांना सुरक्षा साधने, गमबूट, रेनकोट व गणवेश या साहित्यांची खरेदी करण्यासाठी रोख रक्कम मिळावी, सर्व ठिकाणच्या लाइनवर प्रत्येक कट पॉइटवर ए. बी. स्विच व फिडरवरती आयसोलेटर बसवण्यात यावे, मेडिक्लेमच्या नावाखाली होणारी पाचशे रुपयांची कपात बंद करावी. पाच वर्षांपेक्षा जास्त रोजंदारी सेवा केलेल्या वाहिनी कामागाराची रोजंदारी सेवा ग्राह्य धरावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.