‘हत्ती’नदीवरील बंधारा तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:22 AM2018-08-18T01:22:11+5:302018-08-18T01:22:27+5:30

शहराला लागून असलेल्या औंदाणे परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून हत्ती नदीवर बांधलेला बंधारा गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने तुडुंब भरला आहे. या पाण्यामुळे परिसराला पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाला लाभ होणार आहे.

'Elephant' Bandhara Tudumba | ‘हत्ती’नदीवरील बंधारा तुडुंब

‘हत्ती’नदीवरील बंधारा तुडुंब

Next

सटाणा/वीरगाव : शहराला लागून असलेल्या औंदाणे परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून हत्ती नदीवर बांधलेला बंधारा गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने तुडुंब भरला आहे. या पाण्यामुळे परिसराला पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाला लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून,  शुक्र वारी (दि.१७) ग्रामस्थांच्या वतीने या बंधाºयाचे जलपूजन करण्यात आले. औंदाणे व परिसरात दरवर्षी भीषण पाणीटंचाई असते. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. शेती सिंचनाचीदेखील मोठी समस्या आहे. त्यामुळे हत्ती नदीवर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी होत होती; मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मागणी पूर्ण झाली नाही. परिसरातील शेतकºयांनी पुढाºयांच्या भरवशावर न राहता लोकसहभागातून बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला.  औंदाणे येथील प्रकाश निकम, अभिजित निकम, मनोज निकम यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून पैसा जमा करण्याचे काम हाती घेतले. याला शेतकºयांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रमदानातून काम हाती घेण्यात आले आणि बघता बघता बंधाºयाचे काम पूर्णत्वास नेले. यंदा पावसाने ओढ दिल्याने नदीला एकदाही पाणी आले नाही; मात्र गुरुवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे हत्ती नदीला पूर आला. या पाण्याने बंधारा रात्रीतून तुडुंब भरून ओसंडून वाहत आहे. शुक्रवारी सकाळी बंधाºयाचे जलपूजन शेतकरी संघटनेचे प्रकाश निकम, सरपंच सविता निकम, उपसरपंच विजया निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गौरव निकम, नितीन निकम, समाधान तवर, गणेश निकम, प्रभाकर निकम, कैलास पवार, भरत पवार, अशोक निकम, देवीदास निकम, नानाजी चव्हाण, सुरतसिंग पवार, महेंद्र निकम, प्रकाश गरुड, सुनील निकम, स्वप्निल निकम, सुमित निकम, तुळशीराम निकम, बाळू पवार, प्रवीण निकम आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: 'Elephant' Bandhara Tudumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.