हाथी-घोडा पालखी, जय कन्हैया लाल की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:54 AM2018-09-04T00:54:22+5:302018-09-04T00:55:15+5:30
नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी-घोडा पालखी, जय कन्हैया लाल कीच्या जयघोषात मुक्तिधामसह शहरातील विविध मंदिरांत व घराघरांमध्ये रविवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
नाशिक : नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी-घोडा पालखी, जय कन्हैया लाल कीच्या जयघोषात मुक्तिधामसह शहरातील विविध मंदिरांत व घराघरांमध्ये रविवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ‘एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्यांची चाललेली धडपड. शहर व परिसरातील मुख्य चौकांमध्ये सोमवारी (दि.३) उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात पार पडला. विविध वयोगटांतील दहीहंडीप्रेमींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंचवटी, सिडको, गोदाघाट, घनकरगल्ली, माहेश्वरी वसतिगृह येथील मंडळांनी आपापल्या भागात लहान-मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले होते. शहर व परिसरात दहीहंडीचा उपक्र म प्रामुख्याने काही शाळांमध्ये उत्साहात साजरा झाला. रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेत नागरिकांनी उत्सवाचा आनंद लुटला. दहीहंडी फोडण्यात यशस्वी झालेल्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, काही शाळांना कालाष्टमीची सुटी देण्यात आली होती, तर काही शाळा नियमित भरल्या व त्या शाळांमध्ये दहीहंडीची जय्यत तयारी दिसून आली. शाळेतील सभागृहात वा मोकळ्या मैदानात दहीहंडीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा व गोपाळासारख्या गीतांची धूनही सुरू केली गेली. शिक्षकांच्या मदतीने ठिकठिकाणी बाळगोपाळांनी दहीहंडी फोडत गोपाळ काल्याचा आस्वाद घेतला. शहरात काही मंडळांनी या उपक्र माचे आयोजन केले. दरम्यान, महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बाळगोपाळांसाठी दहीहंडी कार्यक्र माचे आयोजन महिंद्रा जीप हाउस, गंगापूररोड येथे मोठ्या उत्साहात झाला. या चिमुकल्या बाळगोपाळांना सर्वसामान्या ंप्रमाणे सकारात्मक दृष्टीने आयुष्य जगता यावे व आयुष्यातील छोट्या-मोठ्या क्षणांचा आनंद भरभरून घेता यावा यासाठी या सदर दहीहंडी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माप्रसंगी महिंद्रा आणि महिंद्राचे कमलाकर घोंगडे, सुशील नांबियार, नामदेव येलमामे आणि यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बाळगोपाळांनी नृत्य, खेळाच्या माध्यमातून मनसोक्त आनंद लुटला.