अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकांची छपाई पूर्ण -31 मे पर्यंत विद्यार्थ्यांना होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 02:51 PM2019-05-26T14:51:55+5:302019-05-26T15:05:36+5:30

शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बालभारतीकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली अशून रविवारी (दि.१६) दुपारपर्यंत सुमारे ८ हजार पुस्तिका उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामुळे  अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु हा संभ्रम दूर झाल्यानंतर माहिती पुस्तिकांच्या छपाईचे काम जवळपास पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिका उपलब्ध होऊ शकणार आहे. 

Eleven entrance information books will be printed by the students till full-31 May | अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकांची छपाई पूर्ण -31 मे पर्यंत विद्यार्थ्यांना होणार उपलब्ध

अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकांची छपाई पूर्ण -31 मे पर्यंत विद्यार्थ्यांना होणार उपलब्ध

Next
ठळक मुद्देअकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार शिक्षण उपसंचालक कार्यालयास माहिती पुस्तिका प्राप्त निकालापूर्वीच ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरता येणार

नाशिक : आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के  आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्यास झालेल्या विलंबामुळे लांबलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया मे महिन्यांच्या अखेरपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बालभारतीकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली अशून रविवारी (दि.१६) दुपारपर्यंत सुमारे ८ हजार पुस्तिका उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामुळे  अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु हा संभ्रम दूर झाल्यानंतर माहिती पुस्तिकांच्या छपाईचे काम जवळपास पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिका उपलब्ध होऊ शकणार आहे. 
नाशिक महापालिका परिसरात गेल्या वर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी २० एप्रिलपासून आॅनलाइन प्रक्रियेस सुरुवात झाली होती, तर १० मेपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वितरण सुरू झाले होते. परंतु यंदा मे महिन्याचा शेवटच्या सप्ताहापर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागली असून आता शिक्षण उपसंचालक कार्यालयास माहिती पुस्तिका प्राप्त झाल्याने विद्यार्थी व पालकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने बालभारतीकडून सुमारे ३० हजार माहिती पुस्तिकांची मागणी केली होती. त्यापैकी आठ हजार पुस्तिका रविवारी दुपारपर्यंत  शिक्षण उपसंचालक कार्यालयास प्राप्त झाल्या असून सायंकाळपर्यंत सर्व पुस्तिका प्राप्त झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत शहरातील माध्यमिक शळांमध्ये या माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

Web Title: Eleven entrance information books will be printed by the students till full-31 May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.