शहरात उच्चांकी ११ जणांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:38 PM2020-07-11T22:38:46+5:302020-07-12T01:58:10+5:30

नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Eleven killed in the city | शहरात उच्चांकी ११ जणांचे बळी

शहरात उच्चांकी ११ जणांचे बळी

Next
ठळक मुद्देधक्कादायक । मृत्युदर कमी होण्याऐवजी वाढच; नागरिकांत चिंता

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असून, आॅक्सिजन पुरवठ्याबरोबरच रेमिडीसीवर इंजेक्शनवर भर देण्यात येत आहेत. रेमिडीसीवर इंजेक्शन थेट मुंबईहून मागविण्यात आले आहेत.
शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृतांची संख्यादेखील वाढतच आहे. महापालिकेने मृत्युदर कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. नियमित चाचण्या तर वाढविल्या आहेच, परंतु अ‍ॅँटिजेन चाचण्यादेखील करणे वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे उपचार पद्धतीतदेखील करण्यात आला आहे. मात्र, मध्यंतरी तीन ते चार दिवस कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या घटली आणि त्यानंतर मात्र ती पुन्हा वाढत गेली.
शनिवारी (दि.११) एकाच दिवसात ११ जणांचा बळी गेला आहे. यात मुंबईनाका येथील भाभानगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, वडाळारोडवरील जयदीपनगर येथील ७० वर्षीय वृद्ध, गंजमाळ येथील उर्दू शाळे जवळ राहणारी ६० वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील ७२ वर्षीय पुरुष त्याचबरोबर पाथर्डी फाटा येथील वासननगर परिसरातील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर टाकळी येथील भीमशक्तीनगर येथे राहणारा ७० वर्षीय वृद्ध, गांधीनगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, एकलहरेरोडवरील भोर मळा परिसरातील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष तसेच पंचवटीतील आरटीओ आॅफिस परिसरातील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचाही मृत्यू झाला आहे. सिडकोतील कामटवाडे येथील डीजीपीनगरातील ४६ वर्षीय महिला तर सातपूर येथील शिवाजीनगर येथील ३४ वर्षीय रुग्णाचादेखील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
शहरात एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या १६५ झाली आहे. तर चोवीस तासात आढळले १६५ बाधित आढळल्याने ही संख्या ३ हजार ९२९ झाली आहे. अर्थात, शहरातील बाधितांच्या संख्येपैकी १ हजार ४९८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर २ हजार २६४ रुग्णच कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या कोरोनाबाधितांचा मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती आॅक्सिजन सिस्टीम सुरू करण्यात आली असून, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे, तर दुसरीकडे औषधांचा पुरेसा वापर करताना सध्या प्रभावी म्हणून गणल्या जाणाºया रेमिडीसीवर इंजेक्शनावर भर दिला जात आहे. सध्या या इंजेक्शनची सर्वत्र टंचाई असल्याने थेट मुंबईहून इंजेक्शन मागविले जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.

Web Title: Eleven killed in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.