संकेतस्थळ बंद झाल्याने अकरावीच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ
By admin | Published: July 14, 2017 03:04 PM2017-07-14T15:04:59+5:302017-07-14T15:04:59+5:30
नाशिकमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी वाढवून दिलेली मुदत संपल्यानंतर संकेतस्थळ बंद झाले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 14 - अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी वाढवून दिलेली मुदत संपल्यानंतर संकेतस्थळ बंद झाले. यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये दाखल झालेले विध्यार्थी व महाविद्यालय प्रशासनाचा गोंधळ उडाला.
शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.14) दुपारी 12 वाजेर्पयत मुदत दिली होती. परंतु, ही मुदत विद्यार्थ्यांसाठी असून कनिष्ठ महाविद्यालयांना माहिती अपडेट करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असा समज प्रवेशप्रक्रिया नियंत्रण समिती आणि महाविद्यालय प्रशासनाचा झाला.
यामुळे शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये सोडण्यात आले. परंतु दुपारी संकेत स्थळ अचानक बंद झाल्याने प्रवेश प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसह कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासनाचाही गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
दरम्यान, प्रवेशप्रक्रियेचे संकेतस्थळ बंद झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुणे येथील मुख्य कार्यालयासोबतसंपर्क साधून प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती देऊन पुन्हा संकेतस्थळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.