अकरा वर्षांनी वाजली शाळेची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:41 AM2018-11-13T00:41:28+5:302018-11-13T00:41:44+5:30
गंगापूररोडवरील मविप्र विद्यालयात २००६-०७ या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१०) शाळेचे मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तब्बल अकरा वर्षांनी दहावीच्या वर्गातील शेकडो विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या स्नेहमेळाव्याला पाऊलखुणा असे नाव देण्यात आले होते.
पंचवटी : गंगापूररोडवरील मविप्र विद्यालयात २००६-०७ या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१०) शाळेचे मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तब्बल अकरा वर्षांनी दहावीच्या वर्गातील शेकडो विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या स्नेहमेळाव्याला पाऊलखुणा असे नाव देण्यात आले होते.
स्नेह व माजी विद्यार्थी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र क्र ीडा अध्यक्ष हेमंत पाटील, माजी मुख्याध्यापक एन. एम. ठोके, एस. टी. अत्रे, ए. एम. पवार, श्रीमती एम. आर. खैरनार, एस. एच. दरेकर, एस. एस. आडके आदी उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन संजय शिंदे, वैभव विधाते, राहुल ढगे, प्रवीण पाटील, राम केदार, सोनू चौधरी, उमेश शिंदे, राहुल तपकिरे आदींनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या विद्यार्थी काय करतात, त्यांचा व्यवसाय काय याबाबत माहिती जाणून घेत शाळेतील एक ना अनेक गमतीदार किस्से सांगून सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच त्यांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देण्यात आले. मेळाव्याला दहावीच्या बॅचमधील दीडशे विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन माधुरी जोशी यांनी केले.
मेळाव्याला मोनू चौधरी, स्वप्नील चव्हाणके, मयूर वरघडे, अक्षय शिंदे, विजय धुमाळ, योगेश मौले, तेजस्विनी वाढणे, स्नेहा चव्हाण, प्रणित वाघ, कुणाल भवर आदींसह उपस्थित होते.
वर्गखोली डिजिटल करणार
तब्बल ११ वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेतल्याची आठवण म्हणून एक वर्गखोली डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थी वर्गणी जमा करून शाळेची एक खोली डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे स्नेहमेळाव्यास स्पष्ट करण्यात आले.