दोन हजार विद्यार्थ्यांना अकरावीची लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:48 AM2017-08-17T00:48:40+5:302017-08-17T00:48:46+5:30
नाशिक : प्रथम पसंती मिळालेले विद्यार्थी तसेच अन्य पसंतीमध्ये क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही त्यामध्ये प्रवेश न घेणाºया विद्यार्थ्यांची विशेष पाचवी फेरी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १९६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, एकूण २९३५ विद्यार्थ्यांची नावे अकरावी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आली आहेत. सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.
नाशिक : प्रथम पसंती मिळालेले विद्यार्थी तसेच अन्य पसंतीमध्ये क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही त्यामध्ये प्रवेश न घेणाºया विद्यार्थ्यांची विशेष पाचवी फेरी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार १९६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, एकूण २९३५ विद्यार्थ्यांची नावे अकरावी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आली आहेत. सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे.अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत आत्तापर्यंत १८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला असून पाचव्या फेरीनंतर आणखी सुमारे दोन हजार विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्याची शक्यता आहे. बुधवारी जाहीर झालेल्या यादीतील विद्यार्थ्यांना १९ तारखेपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. नाशिक महापालिका आणि देवळाली कॅम्प कटक मंडळासाठी गेल्या १० जुलैपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत सुमारे १८ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नाव निश्चित केले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या यादीतील जास्तीत जास्त मुलांना पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने महाविद्यालयांमध्ये मोठे प्रवेश होण्याची शक्यता आहे.
पाचव्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर झालेली नाहीत अशा विद्यार्थ्यांबाबत १९ रोजी सविस्तर सूचना जारी केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नव्हता असे सर्व विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेत असून त्यांचीच पाचवी फेरी काढण्यात आली.प्रथम पसंतीचे सर्वाधिक विद्यार्थी पाचव्या फेरीत ज्यांनी अद्याप प्रवेश घेतलेलाच नाही असे पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांनादेखील स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले असण्याची शक्यता शिक्षण खात्याने वर्तविली आहे.