भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार पक्ष, संघटनेचे बॅनर बाजूला : २ ला सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:40 AM2017-12-22T01:40:27+5:302017-12-22T01:41:10+5:30

नाशिक : २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले आमदार छगन भुजबळ यांच्या विरोधात सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन निर्माण झालेला रोष व्यक्त करण्यासाठी निव्वळ भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºया कार्यकर्त्यांनी गांधीमार्गाने २ जानेवारी रोजी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.

Elgar Party against the government of Bhujbal supporters, banner side of the organization: 2 Satyagraha | भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार पक्ष, संघटनेचे बॅनर बाजूला : २ ला सत्याग्रह

भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार पक्ष, संघटनेचे बॅनर बाजूला : २ ला सत्याग्रह

Next
ठळक मुद्देभुजबळ यांच्यावर गुन्हा दाखलतहसील कार्यालयासमोर सत्याग्रह

नाशिक : २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले आमदार छगन भुजबळ यांच्या विरोधात सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन निर्माण झालेला रोष व्यक्त करण्यासाठी निव्वळ भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºया कार्यकर्त्यांनी गांधीमार्गाने २ जानेवारी रोजी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील संदेश सोशल मीडियावर बुधवारपासून व्हायरल केला जात असून, त्याखाली कोणीही व्यक्ती अथवा पक्ष, संघटनेचे नाव नसून फक्त भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºयांनी तो पसरवला आहे. महाराष्टÑ सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, भुजबळ तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचे कलम ४५ अवैध ठरविल्याने भुजबळ यांना जामीन मिळावा यासाठी न्यायालयात करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सरकार भुजबळ यांना सूडबुद्धीने तुरुंगात अडकवून ठेवत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहेत. संपूर्ण राज्यात एकाच प्रकारचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यावे, असाही मतप्रवाह पुढे आला व त्यातून २ जानेवारी रोजी एकाच वेळी दिवसभर तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात कोणताही पक्ष, समाज, धर्म, संघटना व संस्थांच्या बॅनर्स, पोस्टर्सना दूर ठेवण्यात आले असून, निव्वळ भुजबळ समर्थक अशा एकच ओळखीतून सर्व जमणार आहेत.
राज्यात बैठकांना ऊत
राज्य सरकारला ताकद दाखवून देण्यासाठी २ जानेवारीचे सत्याग्रह आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय भुजबळ समर्थकांनी घेतला असून, राज्यभरात गुरुवारपासून बैठकांना सुरुवात झाली आहे. भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात रविवारपासून तालुकानिहाय बैठका घेऊन सत्याग्रहाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे भुजबळ समर्थकांचे म्हणणे आहे.

Web Title: Elgar Party against the government of Bhujbal supporters, banner side of the organization: 2 Satyagraha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा