सुविधांसाठी ग्रामीण कलावंतांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 03:39 PM2020-03-03T15:39:51+5:302020-03-03T15:42:11+5:30

पेठ : समाजाच्या विकासात महत्वाचे स्थान असलेल्या, भरकटलेल्या समाजाला जनजागृती तसेच कलेच्या माध्यमातून योग्य दिशा देणाऱ्या आदिवासी व ग्रामीण कलाकारांनाही सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पेठ तालुक्यातील कोपूर्ली येथील मेळाव्यात एल्गार पुकारण्यात आला.

 Elgar of Rural Artists for Facilities | सुविधांसाठी ग्रामीण कलावंतांचा एल्गार

सुविधांसाठी ग्रामीण कलावंतांचा एल्गार

googlenewsNext

जिल्ह्यातील कलावंतांच्या मेळाव्यात समाजातील सर्वसामान्यांना अध्यात्मीक , लोककला , रूढी ,परंपरांचा वारसा जतन करण्यासाठी आदिवासी बहुल क्षेत्रातील पेठ , सुरगाणा ,दिंडोरी, कळवण तालुक्यातील भजनी, किर्तनकार, वादक, शाहीर आदी क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. शासनाकडून कलावंताना आर्थिक पाठबळ देणाºया मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या संघटनासाठी एकत्र आली. यावेळी जिल्हास्तरावरु न आलेल्या शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे, लावणी सम्राज्ञी नंदा पुणेकर , शाहीर बाळासाहेब भगत, सनईवादक नितीन धुमाळ, शंकरराव जाधव (बँड पथक), कवी नवनाथ काळे , बाळासाहेब रूढकर , महेंद्र बरेलीकर आदींच्या समोर आपली कला व व्यथा सादर केली . यावेळी शहीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले . त्यामध्ये वृध्द कलावंतांच्या मानधनात वाढ करणे , कलावंतांचा ५ लाखांचा विमा, शासकीय कोट्यातून घरे, साहित्य खरेदीसाठी १० लाखाचे बिनव्याजी कर्ज , कलावंतांसाठी राखीव मतदार संघ करण्यात यावा आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले . शाहीर परिषदेने विभागीय पातळीवर तालुकास्तरावरील समितीची स्थापना करण्यात आली . जिल्हा समितीवरील उपाध्यक्ष ह. भ .प. तात्याबा महाराज भोये यांच्यावर पेठ , सुरगाणा ,कळवण, दिंडोरीतील कामांची जबाबदारी सोपविण्यात आली .तालुका कार्यकारिणीत अध्यक्षपदी पुष्पराज चौधरी, उपाध्यक्षपदी रामदास वाघेरे तर सचिवपदी यादव भोये यांची नेमणूक करण्यात आली . सुत्रसंचालन रामदास वाघेरे यांनी केले .
 

Web Title:  Elgar of Rural Artists for Facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.