मतदार यादी पुन:सर्वेक्षणा विरोधात शिक्षकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:20 PM2019-12-26T17:20:27+5:302019-12-26T17:21:43+5:30
येवला : मतदार यादी पडताळणीच्या कामातून शिक्षकांना वगळावे, यासाठी येवला तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येत निवडणूक कार्यालयाविरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन देऊन काम नाकारणे बाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

विविध अशैक्षणिक कामामध्ये शिक्षक सतत व्यस्त असून गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित होत आहेत. वेगवेगळ्या लाभाच्या योजना, आॅन लाईन कामे, विविध शैक्षणिक प्रशिक्षणे, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने, आॅन लाईन दैनिक विद्यार्थी हजेरी नोंदणी, दैनंदिन पोषण आहार व्यवस्थापन, विद्यार्थी उपस्थिती टिकवणे यांचा हंगाम बहरत असतांना त्यातच तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून इव्हीपीचे (मतदार पुन:सव्हेक्षण) हे काम कारवाईचा बडगा दाखवत शिक्षकांच्या माथी मारले जात आहे.
हे काम खूप वेळखाऊ व किचकट असून प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन एकेकाची अद्ययावत माहिती, पुरावे घेऊन हायब्रीड बीएलओ अॅपद्वारे हे इव्हीपीचे काम करावे लागणार आहे. एका मतदारास १० ते १५ मिनिटे वेळ लागत असून बऱ्याचदा लिंक सर्व्हर खूप हळू चालते.
याप्रसंगी शांताराम काकड, दीपक थोरात, रमेश खैरनार, नारायण डोखे, संदीप शेजवळ, नाना गोराणे, एकनाथ घुले, विजय वाघमोडे, प्रकाश साळुंखे, बाळू आहेर, विजय परदेशी, संतोष चव्हाण आदींसह तालुक्यातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी सह सर्व बी.एल.ओ. शिक्षक उपस्थित होते.