आयटीआय निदेशकांचा सरकारविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:34 AM2018-11-27T00:34:25+5:302018-11-27T00:34:59+5:30

आयटीआयमध्ये रिक्त पदे भरण्यात यावीत यासह गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरुद्ध मंगळवारी (दि.२७) एल्गार पुकारला आहे.

 Eliar against the Government of ITI Directors | आयटीआय निदेशकांचा सरकारविरोधात एल्गार

आयटीआय निदेशकांचा सरकारविरोधात एल्गार

Next

सातपूर : आयटीआयमध्ये रिक्त पदे भरण्यात यावीत यासह गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरुद्ध मंगळवारी (दि.२७) एल्गार पुकारला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव संतोष बोराडे यांनी दिली आहे. शासनाबरोबर अनेक प्रलंबित प्रश्नांवर वारंवार चर्चा करून फक्त आश्वासने मिळाली आहेत. शासन व प्रशासन प्रभावी प्रशिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून पदभरती नाही. सद्यस्थितीत ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा अतिरिक्त पदभार अन्य सहकाऱ्यांना उचलावा लागत आहे. अपुरा कच्चा माल, कालबाह्य हत्यारे, जुनाट यंत्रसामग्री, अपुºया सुविधा अशा परिस्थितीत जागतिक पातळीवरचे प्रशिक्षण देण्याचे शासनाच्या अपेक्षांचे ओझे निदेशकांच्या माथी मारत प्रशासन केवळ प्रवेश, निकाल यांच्या आधारे कागदोपत्री ही योजना सुरळीत सुरू असल्याचे भासवित आहे. शासनाने यात लक्ष घालण्याची गरज आहे. प्रशिक्षणाबरोबरच निदेशकांच्या प्रश्नांवरही शासन व प्रशासन गंभीर नसल्याने अखेर राज्य सरकारच्या विरोधात राज्य निदेशक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन बोगी आरक्षित
मंगळवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरु द्ध मुंबईत एल्गार आंदोलन पुकारले आहे. यादिवशी राज्यातील सर्व आयटीआय बंद ठेवण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होणाºया नाशिक जिल्ह्यातील निदेशकांसाठी पंचवटी एक्स्प्रेसच्या दोन बोगी आरक्षित करण्यात आल्याची माहिती श्रीरत्न बरडे यांनी दिली.

Web Title:  Eliar against the Government of ITI Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.