स्पेनच्या नृत्य स्पर्धेत ‘अभिजात’चा ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:22 AM2017-08-04T00:22:36+5:302017-08-04T00:23:02+5:30

कथक नृत्यात योगदान देणाºया अभिजात नाट्य संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी स्पेन येथे झालेल्या कथक नृत्य स्पर्धेत यश संपादन करत नाशिकची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'Elite' impression in Spanish dance competition | स्पेनच्या नृत्य स्पर्धेत ‘अभिजात’चा ठसा

स्पेनच्या नृत्य स्पर्धेत ‘अभिजात’चा ठसा

Next

नाशिक : कथक नृत्यात योगदान देणाºया अभिजात नाट्य संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी स्पेन येथे झालेल्या कथक नृत्य स्पर्धेत यश संपादन करत नाशिकची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्पेन येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक नृत्य स्पर्धेत अभिजात संस्थेने फ्यूजन प्रकारात प्रथम, रीधून नृत्य प्रकारात द्वितीय तर होरी नृत्य प्रकारात तिसरा क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्राग येथे होणाºया स्पर्धेसाठी विशेष निमंत्रण मिळाले आहे. स्पेन येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातील तेरा देशांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेदरम्यान नितीन पवार यांच्या पवार तबला अकादमीच्या विद्यार्थ्यांनादेखील सन्मानित करण्यात आले. नाशिकच्या विद्यार्थ्यांनी स्पेनमध्ये केलेल्या भारतीय प्रतिनिधित्वाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हे विद्यार्थी नाशिकमध्ये परतताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. अभिजात नृत्य अकादमीत संचालिका विद्या देशपांडे यांचे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

Web Title: 'Elite' impression in Spanish dance competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.