वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटुंबाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:24 PM2019-12-25T13:24:39+5:302019-12-25T13:25:58+5:30

घोटी : वेठबिगारी करण्यास भाग पाडून अत्याचार आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद ...

 Emancipation of aboriginal tribal families | वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटुंबाची सुटका

वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटुंबाची सुटका

Next

घोटी : वेठबिगारी करण्यास भाग पाडून अत्याचार आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील बाळू जाधव यांनी वेठबिगारी आणि अत्याचार केल्याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांना समजले. त्यानुसार त्यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन खात्री केली. वेठबिगारी करणा-या आदिवासी परिवाराला सोडवून त्यांनी पोलिसांकडे धाव घेईल. त्यानुसार फिर्यादी पिंटू गोविंद रण यांनी याबाबत घोटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद असलेली अधिक माहिती अशी की, पिंटू गोविंद रण वय २८ रा. तारांगणपाडा, ता. इगतपुरी यांना संशयित बाळु निवृत्ती जाधव रा. टाकेद याने जुलै महिन्यात २ हजार आणि त्यानंतर १८ हजार रु पये उचल दिली. त्या बदल्यात गणपत वाघ रा. अडसरे यांच्याकडुन त्यांचे राहते घर लिहुन घेतले. उचल फेडण्याकरीता त्यांच्या विटभट्टीवर पिंटू रण याने काम करु न द्यायचे ठरवले. त्याप्रमाणे पिंटू रण हे पत्नी रविता हिच्यासह दिवाळीपासुन आजपर्यंत कामावर होते. काम करत असताना काम कमी केले या कारणावरु न बाळू जाधव याने फिर्यादीच्या अज्ञानपणाचा व गरिबीचा फायदा घेवून शिविगाळ केली. याबाबत पंडित यांना समजल्याने त्यांनी स्वत: जाऊन आदिवासी कुटुंबाची सोडवणूक केली. फिर्यादी आजारी असतांना सुध्दा त्याचेकडुन जबरदस्तीने काम करु न अत्याचार केला आदी गुन्हे केले म्हणून गु.र.नं व कलम - गु.र.नं.९१/२०१९ बंधिबगार वेठबिगारी पध्दती ( उच्चाटन ) अधिनियम १९७६ चे कलम १६,१७,१८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. 

Web Title:  Emancipation of aboriginal tribal families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक